श्रीनगर - जम्मू-काश्मिरमधील जलप्रलयानंतर पूराचे पाणी ओसरू लागले असले तरी, रविवारी सकाळी राज्याच्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या पावसामुळे संकट अधिक वाढले आहे. मदत आणि बचाव कार्यात यामुळे अडचणी येत आहेत. हवामान विभागाने येत्या 24 ते 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. आज (रविवार) सकाळी जम्मूच्या किश्तवाड आणि राजौरीमध्ये जोरदार पाऊस झाला. जम्मू-श्रीनगर महामार्ग खुला होण्यास अजून उशिर होण्याची शक्यता आहे. राज्यातील 49 हजार लोकांना पूरातून वाचवण्यात यश आले आहे. तरीही अजून पाच लाख लोक अडकलेले आहेत. बर्याच दिवसांपासून पुरात अडकल्यामुळे लोकांचा संयमाचा बांध फुटत आहे. शनिवारी नाराज जनतेने बचाव पथकाच्या हेलिकॉप्टरवर दगड फेक केली होती.
महामारी पसरण्याचा धोका, औषधोपचारांची कमतरता
पूराचे पाणी ओसरत असले तरी बर्याच दिवसांपासून पाणी साचलेले असल्यामुळे साथरोगांचा धोका वाढला आहे. श्रीनगरमधील डॉक्टरांना औषधांची कमतरता भासत असल्याचे सांगितले आहे. अजूनही बरेच हॉस्पिटल बंद आहेत. पूराच्या पाण्यात मतृदेह तरंगताना अढळून येत आहेत. यामुळे साथरोगांची भीती व्यक्त होत आहे. एनडीआरएफने बोट हॉस्पिटल सुरु केले आहेत. या बोटी जलमय झालेल्या भागांमधील लोकांना औषधोपचाराची मदत पुरवत आहेत.
5,400 ते 5,700 कोटी रुपयांचे नुकसान
उद्योजकांची संघटना असोचेमने जम्मू-काश्मिरमध्ये आलेल्या पुरामुळे अर्थव्यवस्थेचे 5,400 ते 5,700 कोटी रुपये नुकसान झाला असल्याचा अंदाज वर्तविला आहे. व्यापार, हॉटेल, कृषि, हस्तमाग उद्योगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, पुराशी संबंधीत छायाचित्र