आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Latest News In Marathi Hindu Outfit Spends Lakhs On Ghar Wapsi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंदूंच्या \'घर वापसी\'साठी RSS महिन्याला खर्च करत आहे 50 लाख रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - भारतात राहाणारे सर्व हिंदू आहेत, असे वक्तव्य करणार्‍या राष्ट्रीय स्वंयसेवक संघांने (आरएसएस) 'धर्म जागरण' अभियान हाती घेतले आहे. धर्म जागरण अभियानांतर्गत आरएसएस धर्मांतर केलेल्या 1000 लोकांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याचे काम करणार आहे. त्यासाठी आरएसएस प्रत्येक महिन्याला 50 लाख रुपये खर्च करत आहे. पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये हिंदूंच्या 'घर वापसी'सीठी सुरु असलेल्या अभियानावर फक्त गाड्यांच्या इंधनासाठी आठ ते दहा लाख रुपये खर्च होत आहे. हा भाग मुझफ्फरनगर दंगलीनंतर जातीय हिंसाचाराने होरपळत होता.
धर्म जागरणचे पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी राजेश्वर सिंह म्हणाले, 'घर वापसीसाठी एका कुटुंबावर साधारणपणे पाच हजार रुपये खर्च येतो. यासाठी संघटनेचे 100 पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. ते गावोगाव फिरून धर्मांतर केलेल्या लोकांमध्ये जागृती करतात. धर्मपरिवर्तनानंतर लोकांचे काय नुकसान झाले याची ते लोकांना माहिती देत असतात. त्यानंतर स्वयंसेवक त्यांचे 'घर वापसी' करुन घेतात.'
राजेश्वर यांचा दावा आहे, की दुसर्‍या धर्माचे लोक हिंदू कुटुंबाच्या धर्मांतरासाठी तीन कोटी रुपये खर्च करत आहेत. या वर्षाखेर 20 हजार कुटुंबाची 'घर वापसी' करण्याचे ध्येय निश्चित केले असल्याचे राजेश्वर यांनी सांगितले.
आरएसएसकडून अभियानासाठी वर्षाला 15 लाख रुपये
शहाजंहापूर यथील संघटनेचे कार्यकर्ते अजय सिंह म्हणाले, 'एखादे कुटुंब जेव्हा धर्मपरिवर्तनसाठी तयार होते, तेव्हा त्यांचे शपथपत्र तयार करावे लागते. त्यासाठीचा सर्व खर्च स्वयंसेवकांनाच करावा लागतो.' राजेश्वर सिंह म्हणाले, प्रत्येक महिन्याला शपथपत्रासाठी जवळपास 20 हजार रुपये खर्च होतात. 'घर वापसी'साठी 'शुद्धी यज्ञा'चे आयोजन केले जाते. याचे आयोजन पुन्हा हिंदू धर्मात येत असलेले कुटुंब आणि स्वयंसेवक यांच्या सहकार्यातून होते. यासाठी प्रत्येक जिल्ह्यावर दरमहिन्याला 20 हजार रुपये खर्च होतात. त्यानंतर समजाने त्यांना स्विकारावे यासाठी एका समारंभाचे आयोजन केले जाते. त्यासाठीचा खर्च वेगळा येतो.
मेरठ येथील एका स्वयंसेवकाने सांगितले, 'धर्म जागरणच्या एका विंगसाठी आरएसएस दरवर्षाला 12 ते 15 लाख रुपयांची तरतूद करत आहे. बाकीचा निधी जिल्ह्यातील लोकांच्या सहकार्यातून उभा केला जातो. संघ दरवर्षी त्यासाठी फंडींग करते आणि कामाची समीक्षा देखील केली जाते.