आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Less Than 100 Pilgrims Have Registered For Kedarnath This Year

उत्तराखंडला महाप्रलयाची भीती कायम, केदारनाथच्या भाविकांची संख्या घटली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देहरादून- गेल्या वर्षी उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयाची भीती भाविकांच्या मनात अजूनही कायम असल्याचे दिसून आले आहे. केदारनाथ यात्रेला मे महिन्यात सुरुवात होत असताना मोजक्याच भाविकांनी नोंदणी केली आहे. केदारनाथला जाणार्‍या भाविकांची संख्या कमालीची घसरली आहे. केदारनाथला महामार्गाने जाण्यासाठी आतापर्यंत केवळ आठ भाविकांनी नोंदणी केली आहे तर 77 भाविकांनी हेलिकॉप्टरने जाण्याची तयारी दाखविली आहे. गेल्या वर्षी जवळपास 13 लाख भाविकांनी केदारनाथ आणि बंद्रीनाथची यात्रा केली होती.

उत्तराखंडची अर्थव्यवस्था संकटात...
उत्तराखंडच्या अर्थव्यवस्थेसाठी चारधाम यात्रा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र, गेल्या वर्षी उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलायाच्या पार्श्वभूमीवर यंदा चारधाम यात्रेला जाणार्‍या भाविकांची संख्या मोठ्याप्रमाणात घसरली आहे. परिणामी उत्तराखंड मोठा आर्थिक फटका बसण्‍याची शक्यता नाकारता येत नाही. दरवर्षी देशातून जवळपास दोन कोटी लोक चारधाम यात्रा करतात.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी सांगितले, की केदारनाथ यात्रा सुरु झाल्यानंतर एका दिवसाकाठी केवळ एक हजार भाविकांना सोडण्याची परवानगी देण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर केदारनाथ मंदिरात जाणार्‍या भाविकांच्या संख्येवर यंदा मर्यादा घालून देण्यात आली आहे. चारधाम यात्रेला जाणार्‍या भाविकाचे बायोमॅट्रिक रजिस्ट्रेशन केले जाणार असल्याचे उत्तराखंड प्रशासनाच्या सूत्रांन‍ी सांगितले आहे.

2 मे रोजी अक्षय्य तृतीयाला गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिराचेदद्वार उघडले जाणार आहेत. या दिवशी चारधाम यात्रेला प्रारंभ होईल. केदारनाथ मंदिराचे द्वार चार मे रोजी उघडले जातील. तर बद्रीनाथ मंदिराचे द्वार त्याच्या दुसर्‍या दिवशी अर्थात पाच मे रोजी उघडले जाणार आहेत.

हिमलायाच्या पर्वत रांगेत असलेले केदारनाथमधील मंदाकिनी नदीला आलेला महापूर आणि ढगफुटी झाल्यामुळे महाप्रलय आला होता. हजारो भाविकांचा यात मृत्यू झाला होता. उत्तराखंडमध्ये मोठे नुकसान झाले होते. परिणामी केदारनाथ यात्रा बंद करण्यात आली होती.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, उत्तराखंडमधील महाप्रलय...