आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Man Rapes Neighbour To Satisfy Wife’S Fetish

बंगळुरु : पत्नीला खूश करण्यासाठी शेजारणीवर केला बलात्कार, दांपत्य तुरुंगात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरु - पत्नीच्या इच्छेखातर पतीने शेजारणीवर बलात्कार केल्याची अनोखी घटना बंगळुरुत समोर आली आहे. पीडित महिला आणि आरोपीची पत्नी या दोघींची पूर्वीपासून ओळख होती. पीडित महिलेचे त्यांच्या घरी नेहमी येणे-जाणे होते. त्याचाच फायदा उचलत 'लाइव्ह सेक्स' पाहाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी पतीला मैत्रिणीवर बलात्कार करण्यासाठी आरोपी महिलेने मदत केली. या घटनेची माहिती पीडित महिलेच्या पतीला झाल्यानंतर हे प्रकरण उघड झाले. त्यानंतर आरोपी दिलीप आणि त्याची पत्नी आशा यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, 27 जुलै रोजी आरोपीने स्वतःच्याच घरात हे कृत्य केले. त्यानंतर आशाने पुन्हा एकदा 10 ऑगस्टला मैत्रिणीवर पतीला 'सोबत' करण्यासाठी दबाव टाकला. यावेळी पीडितेने घटनेची संपूर्ण माहिती पतीला दिली आणि 11 ऑगस्टला पोलिसात तक्रार दिली.
तपास अधिकार्‍यांनी सांगितले, की पीडिता आणि आरोपी आशा या दोघींची घनिष्ठ मैत्री होती. त्या नेहमी एकमेकींच्या घरी येत जात होत्या. आशाला पोर्न फिल्म पाहाण्याची सवय असल्याची चर्चा आहे. ती पीडितेलाही नेहमी पोर्न पाहाण्याची जबरदस्ती करत होती, असे या घटनेनंतर बोलले जात आहे. आशाला लाइव्ह सेक्स पाहाण्याची इच्छा होती, तिने हे मैत्रिणीलाही बोलून दाखविले होते. त्यानंतर पीडिता तिच्यापासून आंतर राखून वागत होती.
अशी केली 'इच्छा' पूर्ण
आशाने 27 जुलैला रात्री नऊ वाजता काही कामानिमीत्त पीडितेला घरी बोलावले. तिने पीडितेला तिचा पती दिलीपला 'सहकार्य' करण्यास सांगितले, ज्यामुळे तिला 'लाइव्ह सेक्स' पाहाता येईल. आरोपी दांपत्याने तिला एका खोलीत बंद केले आणि बलात्कार केला. या घटनेची वाच्यता केल्यास तुझ्या पतीला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी त्यांनी पीडितेला दिली. त्यानंतर पीडितेने आशासोबत संपर्क ठेवला नाही. मात्र, 10 ऑगस्टला आशाने पुन्हा एकदा पीडितेला पतीला 'सोबत' करण्यास सांगितले. यावेळी पीडित महिलेने घटनेची संपूर्ण माहिती पतीला दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली आणि दुसर्‍याच दिवशी पोलिसांनी दिलीप आणि आशाला अटक केले. आरोपी दांपत्याविरोधात भारतीय दंड विधानानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.