आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Mukhtar Ansari Not To Contest From Varanasi Seat

नरेंद्र मोदींविरूद्ध लढाणारे \'बाहुबली\' निवडणूक मैदानातून बाहेर; केजरीवालांना पाठिंबा?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी द‍िल्ली- भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींविरुद्ध निवडणूक लढणारे पूर्वांचलचे बाहुबली नेता मुख्तार अंसारी यांनी वाराणसीचे मैदान सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्तार अंसारी यांचे बंधू आणि कौमी एकता दलाचे अध्यक्ष अफजल अंसारी यांनी आज (गुरुवारी) ही माहिती दिली. कॉंग्रेसने अजय राय यांना उमेदवारी दिल्यानंतर मुख्तार अंसारी यांनी निवडणूक मैदान सोडल्याचे तर्कविर्तक लढविले जात आहेत. विशेष म्हणजे मुख्तार अंसारी यांनी अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा दिल्याचे समजते.

वाराणसी मतदार संघातून आता भाजपचे नरेंद्र मोदी, आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल आणि कॉंग्रेसचे अजय राय यांच्या तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. दुसरीकडे, समाजवादी पक्षाने कैलास चौरसिया यांना उमेदवारी दिली आहे.

वाराणसी भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मागील अनेक वर्षांपासून लोकसभा निवडणुकीत भाजपचाच विजय झाला आहे. परंतु केजरीवाल हे मोदींविरोधात मैदानात उतरल्याने वारणशीची ही रंगतदार लढत ठरणार आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, वाराणसी भाजपचा बाल्लेकिल्ला...