आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Very Much Poision In Congress Stamach, Narendra Modi Responded Over Sonia Gandhi

सर्वाधिक विष तर काँग्रेसच्याच पोटात, नरेंद्र मोदींचे सोनियांना प्रत्युत्तर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेरठ (उत्तर प्रदेश) - नरेंद्र मोदी यांनी रविवारी मेरठमध्ये आयोजित विजय शंखनाद सभेत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. सर्वाधिक विष काँग्रेसच्याच पोटात असल्याचे सांगून या देशात सर्वाधिक विष या पक्षानेच चाखले असल्याची टीका मोदींनी केली.
गुलबर्गा येथील सभेत रविवारी सोनियांनी काही राजकीय पक्ष देशात विषाची शेती करत असल्याचे म्हटले होते. याचा मोदींनी दुस-याच दिवशी समाचार घेतला. मेरठमध्ये आयोजित या सभेत मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सत्यपाल सिंह मेरठ वा बागपतमधून लढू शकतात.
या देशात शेतकरी आत्महत्या का करत आहेत, याचे उत्तर लोकांना हवे असताना सोनिया मात्र लोक विषाची शेती करत असल्याचे सांगत आहेत, असे मोदी म्हणाले. काही दिवसांपूर्वी मॅडम सोनियांनी राहुलना सांगितले होते की, सत्ता विषासारखी असते. मग, या देशात गेल्या 60 वर्षांपासून सर्वाधिक काळ सत्ता कोणी भोगली? या विषाचा स्वाद सर्वाधिक कोणी चाखला? कोणाच्या पोटात आता सर्वाधिक विष आहे? विष पसरवण्याचे काम कोण करते?, असे प्रश्न त्यांनी जनतेला उद्देशून विचारले. देशात फोडा आणि राज्य करा, या धोरणानुसार काँग्रेस राज्यांतही भांडणे लावत आहे. छत्तीसगड, झारखंड व उत्तराखंडची अटलबिहारी वाजपेयींनी निर्विवाद निर्मिती केली. मात्र, काँग्रेस तेलंगणा निर्मितीसाठी झटत असताना दोन राज्यांतून विरोध होत आहे, असा दाखला त्यांनी दिला.

पुढील स्लाइडमध्ये, मोदी उवाच...