आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Pakistan Violates Ceasefire Again, Targets 25 BSF Posts In J&K

कुपवाडामध्ये लष्कराच्या गस्ती पथकावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे पाकिस्तानी हद्दीतून घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांनी भारतीय लष्करावर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद झाला आहे. केरन सेक्टरमध्ये शनिवारी रात्री दहशतवाद्यांनी लष्कराच्या एका गस्ती पथकावर हल्ला केला. लष्कर आणि दहशतवादी यांच्यात कालारुस येथे चकमक झाली. यावेळी 6 ते 7 दहशतवादी असल्याचे सांगण्यात आले आहे.
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन होत असल्याने सीमेवर तणाव वाढला आहे. सीमेवरील 22 चौक्या आणि 13 गावांत शुक्रवारी रात्रभर झालेल्या गोळीबारानंतर ही गावे रिकामी करण्यात आली आहेत. दरम्यान, पाकिस्तानी रेंजर्सनी दोन दिवस आधीच आपल्या बाजूची गावे रिकामी करून घेतली होती. अखनूर सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ 50 मीटर लांबीचे भुयार आढळल्याने लष्कर सतर्क झाले आहे.
संरक्षणमंत्र्यांची प्रतिक्रिया
लष्कराचा एक जवान शहीद आणि पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन यावर संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी, पाकिस्तान आम्हाला चिथावणी देण्याचा प्रयत्न करत आहे. बीएसएफ आणि लष्करी जवान संपूर्ण ताकदीने पाकच्या गोळीबारास प्रत्युत्तर देत आहेत. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, सीमेवर तणाव आहे, पण सध्या युद्धासारखी स्थिती नाही.

छायाचित्र - जम्मूच्या सीमेजवळील एका गावात शनिवारी पाकिस्तानकडून झालेल्या मोर्टार हल्ला झाला. मोर्टारचा शेल दाखविताना स्थानिक महिला.