(फोटो- सोशल मीडियावर जम्मू आणि काश्मिरचे फुटीरतावादी नेते यासिन मलिक यांचा हा फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.)
श्रीनगर- जम्मू आणि काश्मिरमध्ये महापूर आला आहे. ठिकठिकाणी अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्याचे काम भारतीय लष्कराकडून केले जात आहे. काही गावांना पूराने वेढले आहे. अशा ठिकाणी अन्नाची आणि इतर महत्त्वपूर्ण पाकिटे टाकली जात आहेत. परंतु, काही स्थानिक फुटीरतावादी नागरिक लष्कराच्या जवानांवर दगडफेक करुन नुकसान पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. यात आता तर कळसच झालाय. फुटीरतावादी नेते यासिन मलिक यांनी मदत कार्याची एक नौकाच हायजॅक केली. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
जम्मू आणि काश्मिर लिबरेशन फ्रॅंटचे नेते यासिन मलिक यांनी समर्थकांसह भारतीय लष्कराची मदतीची नौकाच हायजॅक केली. ही घटना 13 सप्टेंबर रोजी घडली. यावर सोशल मीडियावर जोरदार प्रहार करण्यात येत आहे. ए
किकडे भारतीय लष्कराचे जवान मदत करीत असताना त्यांच्यावर दगडफेक करायची आणि दुसरीकडे मदत कार्यातील नौकाच हायजॅक करायची ही कोणती मानसिकता आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.
भारतीय जवानांना एका महिलेचे मदत करु दिली नाही
लष्कराच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासिन मलिक आणि त्यांच्या समर्थकांनी एका महिलेला लष्कराच्या मदत नौकेवरुन बळजबरी उतरवले. याशिवाय एक नौका घेऊन लष्कराच्या जवानांना हा परिसर रिकामा करण्याची धमकी दिली. यावेळी यासिन यांच्यासोबत त्यांचा सहकारी मीरही होता. यावेळी यासिन म्हणत होते, की काश्मिरी लोकांना भारतीय लष्कराची मदत नको. यासिन यांना काही महिला विरोध करीत होता. परंतु, यासिन यांनी धमकवल्यावर त्या गप्प बसल्या. यावेळी यासिन यांच्या समर्थकांनी जवानांवर दगडफेकही केली.
पुढील स्लाईडवर वाचा, सोशल मीडियावर यासिनवर कसा हल्ला चढवला जात आहे...