आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Sri Ram Sena Chief Pramod Muthalik Joins BJP

श्रीराम सेनेचे मुतालिक यांच्या प्रवेशाला भाजप नेत्यांचा विरोध, सदस्यत्व एका दिवसात रद्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धारवाड - कर्नाटकातील कट्टर हिंदूत्वाची पुरस्कर्ती संघटना श्रीराम सेनाचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांच्या भारतीय जनता पक्ष प्रवेशावरुन वाद निर्माण झाल्यानतंर काही तासांतच त्यांचे भाजप सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. चिथावणीखोर भाषण देणे आणि पबमध्ये हल्ला करुन धुडगुस घालण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यामुळे भाजपच्या नेत्यांनी मुतालिक यांच्या प्रवेशाला विरोध केला. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले, मुतालिक यांना भाजपमध्ये प्रवेश देऊ नये. पक्षाला त्यांची गरज नाही. पक्ष नेतृत्वाने तत्काळ त्यांचे सदस्यत्व रद्द करावे.' याशिवाय इतरही नेत्यांकडून दबाव आल्यानंतर भाजपने त्यांचे सदस्यत्व रद्द केले.
मोदींना पंतप्रधान करण्यासाठी भाजपमध्ये - मुतालिक
प्रमोद मुतालिक यांनी रविवारी कर्नाटक भाजप कार्यालयात अनेक नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यांना भाजपचे प्राथमिक सदस्यत्व देण्यात आले. यावेळी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार, कर्नाटक प्रदेशाध्यक्ष प्रल्हाद जोशी आणि माजी उपमुख्यमंत्री के.एस. इश्वरप्पा उपस्थित होते. भाजप प्रवेशानंतर मुतालिक म्हणाले, नरेंद्र मोदींना पंतप्रधान करणे , ा एकमेव उद्देशाने भाजपमध्ये दाखल झालो आहे.