आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Victim Of Sexism Trainee IPS Delete Facebook Page

सेक्सिझमच्या शिकार ट्रेनी IPS ने डिलिट केले FB प्रोफाइल, तर तयार झाले अनेक पेज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - सोशल साइट्सवर सेक्सिझमच्या शिकार झालेल्या प्रशिक्षणर्थी महिला आयपीएस मेरिन जोसेफ यांनी त्यांचे फेसबुक पेज डिलिट केल आहे. हैदराबादमध्ये प्रशिक्षण सुरु असतानाच मेरिन यांना कोच्चीच्या एसीपी म्हणून नियुक्ती मिळाली असल्याची सोशल साइट्सवर अफवा पसरली होती. त्यासोबत त्यांचा पोलिस गणवेशातील फोटो देखील अपलोड करण्यात आला होता. त्यावर युजर्सनी विविध पद्धतीच्या कॉमेंट्स केल्या होत्या. काहींनी तर त्यांच्या सुंदर असण्यावरही टिप्पणी केली होती. 'अशा सुंदर पोलिस अधिकार्‍याकडून अटक करुन घ्यायला कोणाला अवडणार नाही.' अशा पद्धतीच्या कॉमेंट्स केल्या गेल्या होत्या. त्यानंतर आता त्यांनी त्यांचे फेसबुक अकाउंट डिलिट केले आहे.
या महिन्याच्या 11-12 तारखेला फेसबुकवर मेरिन जोसेफ यांना पब्लिक फिगर असल्याचे दाखवत कमीत कमी तीन पेज तयार झाले. त्यांना सोशल साइट्सव झपाट्याने लाइक्स मिळू लागल्या. 11 सप्टेंबर रोजी तयार करण्यात आलेल्या पेजला 13 तारखेला दुपारपर्यंत 32,729 युजर्सनी लाइक केले आहे. अशाच दुसर्‍या एका पेजला 11 हजारापेक्षा जास्त लाइक्स मिळाल्या आहेत.
काय आहे प्रकरण
हैदराबाद येथील राष्ट्रीय पोलिस अकादमी येथे प्रशिक्षण सुरु असलेल्या मेरिन जोसेफ यांनी स्वतःचा पोलिस गणवेशातील एक फोटो फेसबुकवर अपलोड केला होता. गुरुवारी Kochi pazhaya Kochiyalla नावाच्या फेसबुक पेजने त्यांचा हाच फोटो घेऊन, या कोच्चीच्या नव्या एसीपी असल्याची पोस्ट टाकली होती. काही तासांतच त्याला 10 हजाराहून अधिक लाइक्स मिळाल्या आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या कॉमेंट्स केल्या जाऊ लागल्या.
जोसेफ यांच्या स्पष्टीकरणानंतरही थांबल्या नाही कॉमेंट्स
कॉमेंट्सने वैतागलेल्या जोसेफ यांनी स्पष्टीकरण करणारी पोस्ट टाकली. त्यात त्यांनी लिहिले, ' An urgent clarification- i am NOT the new ACP of Kochi. Still under training in NPA Hyderabad. Will update when I get my first charge in January next year. Kindly refrain from believing baseless rumours floating in social media. Thanks.' त्यानंतरही अभद्र कॉमेंट्सचा प्रकार थांबलेला नाही.
पहिल्याच प्रयत्नात आयपीएस
मेरिन जोसेफ या दिल्लीच्या प्रतिष्ठीत सेंट स्टिफन्स कॉलेजच्या पदविधर आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) घेतलेल्या परीक्षेत त्या पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाल्या आणि त्यांनी आयपीएस जॉइन करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या बॅचच्या त्या सर्वात तरुण आयपीएस आहेत. नुकत्याच ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या युथ समिटमध्ये त्यांनी भारतीय शिष्टमंडळाचे प्रतिनिधीत्व केले होते.

(फेसबुक पेजवरुन घेण्यात आलेले प्रशिक्षणार्थी आयपीएस मेरिन यांचे छायाचित्र)
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मेरिन जोसेफ यांच्या नावाने सुरु झालेले बनावट फेसबुक पेज आणि त्यांच्यासंबंधी करण्यात आलेली टिप्पणी आणि छायाचित्रे...