आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News ISIS Indian Figure In Ganesh Festival Video

कल्याणच्या ISIS तरुणांवरील माहितीपट गणेशोत्सवात दाखवण्यावरून तणाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : दहशतवादी संघटना मुस्लीम युवकांना आकर्षित करण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करत आहेत, हे दाखवणारे बॅनर.

मुंबई - गणेशोत्सवादरम्यान एक व्हिडिओ दाखवण्याच्या मुद्यावरून पोलिस आणि गणेश मंडळाच्या आयोजकांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या व्हिडिओमध्ये दहशतवादी संघटना ISIS मध्ये सहभागी होण्यासाठी गेलेल्या चार भारतीय मुस्लीम तरुणांबाबत माहिती आहे. पोलिसांनी मात्र हा माहितीपट दाखवण्यास नकार दिला आहे. यामुळे एका समुदायाच्या भावना दुखावल्या जाऊना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

मंडळाचे सल्लागार भिकाजी साळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर हायकोर्टातून स्थगिती मिलवली आहे. मुंबईच्या कल्याणमधील चार तरुण इराकमध्ये आयएसआयएसमध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यापैकी एकाचा मृत्यूही झाला आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईच्या कल्याण येथील 'विजय तरुण मंडळाला' पोलिसांनी गणेशोत्सवादरम्यान दाखवल्या जाणा-या एका व्हिडिओमधून चार मुस्लीम युवकांबाबात माहिती आहे. कट्टरवादी मुस्लीम युवकांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचे यात दाखवण्यात आले आहे. मंडळ अनेक वर्षांपासून सामाजिक विषयावर संदेश देण्यासाठी अशा प्रकाराचा वापर करत असतात असे मंडळाचे म्हणणे आहे. पण कायद्यानुसार मंडळाने कार्यक्रमांसाठी पोलिसांची परवानगी घेणे गरजेचे असते. तसेच आयोजनाची विस्तृत माहिती देणेही गरजेचे असते.
मंडळाचे म्हणणे ...
मंडळात हिंदु आणि मुस्लीम दोन्ही समुदायांच्या लोकांचा समावेश असल्याचे मंडळाचे म्हणणे आहे. मंडळाचे संस्थापक अयूब शेख यांच्या मते, आमच्या मंडळातर्फे दाखवल्या जाणा-या व्हिडिओमुळे मुस्लीम समुदायाच्या भावना दुखावल्या जाणार नाही. दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होणे म्हणजे सामाजिक कार्य नाही. आम्हाला त्याबाबत जागरुकता पसरवायची आहे. तरुण विजय गणेश मंडळाला शांततापूर्वक उत्सवाचे आयोजन केल्याबद्दल अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.