फोटो : ढिगा-यात दबलेल्या गावातील नागरिकांचा शोध घेणारे नातेवाईक.
श्रीनगर - माळीणची आठवण करून देणा-या जम्मू-काश्मीरमच्या उधमपूर जिल्ह्यातील सदाल गावच्या दुर्घटनेनंतर आतापर्यंत ढिगा-यातून 40 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यामध्ये एका नवजात बालकाचाही समावेश आहे. मदतकार्य करणा-या जवानांपैकी एकाला या बालकाचा हात दिसला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
गेल्या शनिवारी पाण्याच्या प्रवाह आणि भूस्खलनानंतर येथील 30 घरे, त्यातील लोक, जनावरे असे अख्खे गावच ढिगा-याखाली दबले होते. हिमालयाच्या सीमेपासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावरील या गावात जवळपास 200 लोक राहत होते. जोरदार पावसाच्या सूचनेनंतर काही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. त्यामुळे काही नागरिक या दुर्घटनेतून सुखरुप बचावले आहेत.
पुढे वाचा, झेलमवरील बंधा-याच्या भेगांमधून अद्याप पाणी सुरुच...