आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू दहशतवादी हल्ल्याची \"आंखों देखी\", असा झाला भीषण हल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू- भारतीय लष्कराच्या सांबा येथील छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात तेथील गार्डनची देखभाल करणारा व्यक्ती बहादुर याने सांगितलेली माहिती अतिशय भयावह आहे. दहशतवाद्यांपासून वाचण्यासाठी बहादुर बाथरुममध्ये लपला होता. सुमारे 30 तास तो तेथेच लपून बसला होता.

बहादुरने सांगितले, की दररोजप्रमाणे मी सकाळी 6 वाजता छावणीत गेलो होतो. सुमारे 7.30 च्या सुमारास गोळीबार सुरू झाला. तीन दहशतवादी हातात शस्त्रे घेऊन अंदाधुंद गोळीबार करीत होते. दुसरीकडे बघितले तर बिक्रमजीतसिंग साहेब रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. जरा वेळात त्यांच्या मागे असलेला जवानही गोळी लागू ठार झाला. मला प्रचंड भीती वाटली. मी जवळच असलेल्या एका बाथरुममध्ये लपून बसलो. गोळीबाराचा आवाज आणखी जोरात येऊ लागला. त्या आवाजाने मी बेशुद्धच पडलो. जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हाही गोळीबार सुरुच होता. मला एवढी भीती वाटली, की मी बाथरुम बाहेर येण्याचे धाडस करू शकलो नाही. गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुमारे 30 तासांनी शुक्रवारी दुपारी 1 वाजता बहादुर जेव्हा बाहेर आला तेव्हा ढसाढसा रुडू लागला.

भीतीमुळे तोंडातून आवाजही निघत नव्हता...वाचा पुढील स्लाईडवर...