आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Marathi Furious At Dhoti Ban In Clubs, Jayalalithaa Says 'Will Cancel Licences'

जयललितांचा इशारा : लुंगी बॅन करणा-या क्रिकेट क्लबचे परवाने रद्द करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - लुंगी (दक्षिणी धोती) परिधान केलेल्यांना प्रवेश नाकारणा-या क्रिकेट क्लबना तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी कडक इशारा दिला आहे. हा प्रकार म्हणजे संस्कृतीचा अपमान असून असे करणा-या क्लबवर परवाना रद्द करण्याची कारवाई करणार असल्याचे जयललिता म्हणाल्या आहेत. तसेच तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनकडून अशा एका घटनेसंबंधी स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.

कायदा बनवणार
मुख्यमंत्री जयललिता तामिळनाडू विधानसभेत बुधवारी म्हणाल्या की, स्वातंत्र्याच्या 67 वर्षांनंतरही देशात अशा प्रकारच्या घटना घडणे हे दुर्दैव आहे. सरकार नवा कायदा तयार करून खासगी क्लबमध्येही अशा प्रकारे बंदी अशल्यास ती बंदी हटवण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. लवकरच विधानसभेत हा कायदा संमत केला जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.

काही दिवसांपूर्वीच तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या क्लबने मद्रास हाय कोर्टाच्या एका न्यायाधीशांना एका कार्यक्रमात धोती परिधान केल्याच्या कारणामुळे प्रवेश नाकारला होता. त्यानंतर डीएमके प्रमुख करुणानिधि आणि डाव्यांसह सर्वांनीच या प्रकाराचा निषेध नोंदवला होता.
फाइल फोटो : पक्षाच्या एका अधिवेशनात सहभागी झालेल्या तामिळनाडूच्या सीएम जयललिता