आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालखनौ- दंगल भडकवण्याच्या आरोपावरून भाजपचे आमदार सुरेश राणा यांना लखनौमध्ये अटक करण्यात आली आहे. विधानसभा येथून गोमतीनगरकडे जात असताना पोलिसांनी राणा यांना अटक केली.
आयजी (कायदा व सुवस्था) राज कुमार विश्वकर्मा म्हणाले, आमदार सुरेश राणा यांना अटक झाली असून त्यांना मुझफ्फरनगर येते आणले जाणार आहे. सुरेश राणा यांच्यावर प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप आहे.
मुझफ्फरनगरातील दंगली शमल्यानंतर आता त्यावरून राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. वारंट बजावल्यानंतर एकाही आरोपीला गुरुवारी अटक झाली नाही तर दुसरीकडे युपी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी समाजवादी पक्षाच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदारांमध्ये तुबंळ हाणामारी पाहायला मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे आमदार सुरेश राणा यांने सभागृहात सुरु असलेल्या चर्चेत मुझफ्फरनगर दंगलीप्रकरणी अखिलेश सरकारला जबाबदार ठरवले. याचवेळी सभागृहात उपस्थितीत असलेल्या समाजवादी पक्षाच्या आमदार आणि अखिलेश सरकारच्या मंत्री अंबिका चौधरी यांनी राणा यांच्यावर वक्तव्यावर आक्षेप घेऊन त्यांना शांत बसण्यास सांगितले. तितक्यात राणा यांच्यासह भाजपच्या अन्य आमदारांनी अंबिका चौधरीवर हल्लाबोल केला. समाजवादीच्या आमदारांनीही त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात उतरले. त्यांच्या तुबंळ हाणामारी झाली. सभागृहातील दोन्ही पक्षाच्या अन्य सदस्यांनी मध्यस्थी केल्यानंतर प्रकरण शांत झाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.