नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या सरकारने मंगळवारपासूनच कामाला सुरुवात केली आहे. पण असे अनेक मुद्दे आहेत, जे या नव्या सरकारसाठी डोकेदुखी ठरणार आहेत. अनेक हिंदुत्त्ववादी संघटनांचे आव्हानही मोदींसाठी तसेच त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.
श्री राम सेना
श्री राम सेनेची स्थापना 1960 मध्ये कल्कि महाराज ने केली होती. ही संघटना मॉरल पोलिसींगसाठी कायम चर्चेत राहते. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकांपूर्वी श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. पण चारही बाजुंनी टीकेची झोड उठल्याने काही तासांतच त्यांना पक्षातून काढून टाकावे लागले होते. या संघटनेने त्यांच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार ही संघटना संघाचे संस्थापक केशवराव बळीराम हेडगे यांच्या विचाराने प्रेरित आहे. त्यामुळे महिलांना आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य देण्याचे आश्वासन देणारे मोदी श्रीराम सेनेवर नियंत्रण कसे ठेवणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
का ठरली आव्हान
- 2009 मध्ये या संघटनेने मँगलोरच्या एका पबमध्ये महिलांवर हल्ला केला.
- महिलांनी मद्यपान करणे, नृत्य करणे आणि पाश्चिमात्य कपडे परिधान करणे याला संघटनेचा विरोध आहे.
- माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनी श्रीराम सेना धोकादायक असल्याचे मत व्यक्त केले होते. संघटनेवर टीका करताना ते म्हणाले होते की, कोणत्याही संघटनेला पोलिस बनण्याची परवानगी दिली जाणार नाही.
फोटो : मँगलोरच्या एक पब बाहेर श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी तरुणांना मारहाण केली होती.
पुढे वाचा - आणखी कोणत्या संघटना ठरू शकतात मोदींसाठी आव्हान