आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मिस्‍ड कॉल\'च्या मदतीने थांबवणार आशुतोष महाराज यांच्या पार्थिवावरील अंत्यसंस्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालंधर/चंडीगड- जालंधर येथील नूरमहल दिव्य ज्योती जागृती आश्रमाचे संचालक आशुतोष महाराज यांना कोर्टाने मृत घोषित करून त्यांच्या पार्थिवावर 15 दिवसांत अंत्यसंस्कार करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, आशुतोष महाराजांच्या भक्तांनी कोर्टाचे आदेश धाब्यावर ठेवले आहेत. आता ‍तर आशुतोष महाराज यांच्या भक्तांनी एक नवी शक्कल शोधून काढली आहे. ती म्हणजे, एक टोल फ्री क्रमांक जारी करण्‍यात आला आहे. टोल फ्री क्रमांकावर बुधवारी रात्री 12 वाजेपर्यंत मिस्ड कॉल करण्याचे जनतेला आवाहन करण्यात आले आहे. मिस्ड कॉलच्या आधारावर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

दरम्यान, आशुतोष महाराज यांचा मृत्यु की समाधी याचे गुढ अजूनही कायम आहे. कोर्टाने मृत घोषित करून त्यांच्या पार्थिवावर 15 दिवसांत अंत्यसंस्कार करण्याचे आदेश दिले होते. मात्र, हायकोर्टाच्या आदेशाविरोधात महाराजांच्या भक्तांनी दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. कोर्टाने पुढील सुनावणी नऊ जानेवारी निश्चित केली आहे.

दरम्यान, आशुतोष महाराज यांचे पार्थिव मागील 10 महिन्यांपासून शून्य डिग्री सेंटीग्रेड तापमान असलेल्या खोलीत ठेवण्यात आले आहे. आशुतोष महाराज सद्यस्थितीत समाधीत असल्याचा दावा आश्रमातील भक्तांनी केला आहे. दुसरीकडे, डॉक्टरांनी आशुतोष महाराज यांना मृत घोषित केले आहे. आशुतोष महाराज यांच्या पॉपर्टीसाठी हा सगळा प्रकार सुरु असल्याची चर्चा आहे.

टोलफ्री नंबर जारी
आशुतोष महाराज यांच्या भक्तांनी रविवारी एक टोल फ्री क्रमांक जारी केला. टोल फ्री क्रमांकावर बुधवारी रात्री 12 वाजेपर्यंत मिस कॉल करण्याचे आवाहन आश्रमातील भक्तांनी केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आशुतोष महाराजांविषयी माहिती देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मिस्ड कॉलचा आधार घेऊन आशुतोष महाराज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करायचे की नाही, याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

आशुतोष महाराजांच्या आश्रमात रविवारी एक भंडारा आयोजित करण्यात आला. आशुतोष महाराज सध्या समाधीत असून ते लवकरच त्यातून बाहेर येतील, असे सांगण्यात आले. तसेच उपस्थित भक्तांना लघुपटही दाखवण्यात आला.

आश्रमाचे स्वामी नरेंद्रानंद आणि साध्वी मनस्वनी भारती यांनी भक्तांना सांगितले की, यापूर्वीही आशुतोष महाराज समाधी घेतली होती. त्यांचा मृत्यु झाल्याचे मत अनेकांनी मांडले होते. मा‍त्र, त्यानंतर काही दिवसांतच महाराज समाधीतून बाहेर येऊन त्यांनी आपल्या भक्तांशी संवाद साधला होता.