आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल यांची आजी-पंजोबा करायचे दंगलीचे राजकारण, युवराजांच्या आरोपाला आझम यांचे उत्तर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीगढ - जातीय दंगली या राजकीय फायद्यासाठी घडवल्या जातात, मुझफ्फरनगर दंगलीमागेही राजकारण असल्याचे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. अलीगढ येथील काँग्रेसच्या सभेत राहुल गांधींनी हे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, 'मुझफ्फरनगर दंगलीमागे राजकारण आहे. मी तिथे गेलो होतो. तेथील लोकांना भेटलो. दोन्ही समुदायातील लोक म्हणाले आमच्यात कोणतेही वैर नाही. ही दंगल राजकीय लोकांनी घडवून आणलेली आहे.' राहुल यांच्या या वक्तव्याचा समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तरप्रदेशचे मंत्री आझम खान यांनी समाचार घेतला आहे. आधी 1992 च्या दंगलीचे उत्तर द्या असा सवाल त्यांनी केला आहे. (काय म्हणाले आझम खान वाचा पुढील स्लाइडमध्ये)

दोषी नेत्यांच्या संदर्भातील अध्यादेशावर ते म्हणाले, 'माझी विरोधाची भाषा कडवट होती मात्र, भावना खरी होती. त्याबद्दलही अनेकांचा आक्षेप आहे. त्यांचे म्हणने आहे की, हीच वेळ होती का? माझा तुम्हाला सवाल आहे, खरे बोलण्यासाठीही आता मुहूर्त काढावा लागणार आहे का?'

(गुगल सर्च टेंडस् मध्ये भाजप-काँग्रेसच्या बरोबरीने या छोट्या पक्षांचाही लागला नंबर)

राहुल गांधींनी भाषणाच्या सुरवातीलाच उपस्थित जनसमुदायाला काही प्रश्न विचारले. ते म्हणाले, 'युपीए सरकार कसे काम करत आहे? सरकार दिलेली आश्वासने पाळत आहे का?' त्यानंतर त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलश यादव यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, 'त्यांनी आश्वासने तर दिली मात्र पूर्ण करू शकलेले नाहीत. ज्या लॅपटॉपचे वाटप करण्यात आले ते निकामी आहेत. राज्यात कॉम्पुटरचे राज्य आहे मात्र, वीज गूल आहे.'


पुढील स्लाइडमध्ये, राहुल गांधींची आजी आणि पंजोबा करायचे दंगलीचे राजकारण