आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Rape Survivor Waits 3 Hours Naked For Test

वैद्यकीय चाचणीसाठी बलात्कारातील पीडितेला तीन तास ठेवले विवस्त्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेंगळुरू : बलात्कारातील पीडितेचा उपचार आणि तपासासाठी सरकारने यावर्षीच मार्च महिन्यात नवी आचारसंहिता लागू केली होती. मात्र कर्नाटकात या आचारसंहितेची ऐशी-तैशी करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. येथील एका सरकारी रुग्णालयात बलात्कारातील एका पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी तब्बल तीन तास विवस्त्र अवस्थेत वाट पाहायला लावण्यात आली. कर्नाटक महिला आयोगाच्या अध्यक्षा मंजुला मानसा यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
काय आहे प्रकरण?
म्हैसूरच्या छेलूवांबा येथील सरकारी रुग्णालयात हा प्रकार घडला. याठिकाणी मानसिक रुग्ण असलेल्या 23 वर्षीय बलात्कार पीडित तरुणीला येथील कर्मचा-यांनी नग्नावस्थेतच वाट पाहायला लावली. तसेच पीडितेच्या कुटुंबीयांचा अपमानही केला.
पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, तरुणीला तीन तास विवस्त्र अवस्थेत रुग्णालयातील बेडवर बसून राहायला लावले. तर या प्रकरणी स्पष्टीकरण देताना, आमच्याकडे बलात्कार प्रकरणाच्या तपासण्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्याचे, रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
फोटो - प्रतिकात्मक
पुढे वाचा - काय आहे पीडितांच्या तपासणीसाठी आचारसंहिता...