आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest Photos Of Disaster Due To Monsoon In Uttarakhand

बिहारच्या माजी मंत्र्यांनी सांगितली आपबिती, मृतदेहांसोबत काढल्या चार रात्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहरादून - बिहारचे माजी आरोग्यमंत्री अश्विनी चौबे यांनी उत्तराखंडमधून परल्यानंतर आपबिती कथन केली आहे. डेहरादूनमध्ये ते म्हणाले, केदारनाथ येथे एवढे भीषण संकट आल्यानंतरही सरकार आणि प्रशासन काहीही करत नाही. चौबे यांनी वैयक्तिक प्रयत्नांनीच कुटुंबासह सुखरूप परतल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, चारही बाजूंनी मृतदेहांचा खच पडलेला होता. ते उचलण्यासाठीही कोणी नव्हते. जे लोक या प्रलयामधून वाचले होते ते, या मृतदेहांवर आपला पाय पडणार नाही अशा पद्धतीने जीव वाचवत पुढे निघाले होते.
दरम्यान, उत्तराखंडमधील महाप्रलयानंतर येथील केदारनाथ आणि बद्रीनाथ पुढील तीन वर्षांसाठी भाविकांसाठी बंद राहाणार असल्याचे स्थानिक अधिका-यांनी सांगितले आहे.

चार दिवस केदारनाथ येथे अडकलेले चौबे म्हणाले, माझ्या कुटुंबातील पाच जण बेपत्ता आहेत. चार रात्री मी मृतदेहांजवळ रडत काढल्या. त्यावेळी 800 हून अधिक लोक मंदीरात माझ्या सोबत होते. काहीजणांचा माझ्या डोळ्यांदेखत प्राण गेला. त्यावेळी मी काहीही करू शकत नव्हतो. मंदीरात मृतदेह पाण्यावर तरंगत होते. मात्र, राज्य सरकारकडून कोणतीही मदत मिळत नव्हती. अशी आपत्ती याआधी मी कधीही पाहिलेली नाही. या आसमानी संकटात 15 ते 20 हजार लोक मृत्यूमुखी पडले असण्याची शक्यता चौबे यांनी व्यक्त केली आहे.

केदारनाथ येथे बचाव कार्य अजूनही सुरू आहे. रस्ते उद्धवस्त झाल्याने केवळ हवाई मार्गाने मदत पोहचविली जात आहे. त्यामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 19 हजार लोकांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, अजूनही 62 हजार लोक उत्तराखंडच्या विविध जिल्ह्यांमध्ये अडकलेले आहेत.