आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अयोध्येत तणावाची परिस्थिती, साधुंचे जथ्ये रोखण्यासाठी सुरक्षेचे अनेक कडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्या / लखनौ - चौ-यांशी कोस अयोध्या परिक्रमेमुळे उत्तरप्रदेश सरकार आणि यंत्रणेवरील ताण वाढला आहे. अयोध्या परिक्रमेच्या मार्गातील जिल्ह्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच साधुंचे जथ्ये रोखण्यासाठी सुरक्षेचे अनेक कडे निर्माण करण्यात आले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दावा केला आहे, की परिक्रमेत सहभागी होण्यासाठी हजारो साधु अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्येतून परिक्रमा सुरु झाल्यानंतर ठिकठिकाणाहून साधु-संत त्यात सहभागी होणार आहेत.

राज्य सरकारने अयोध्येत मोठा फौजफाटा तैनात केला आहे. त्यामुळे शहराला छावणीचे रुप प्राप्त झाले आहे. येथे 144 कलम लागू करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून साधु-संन्यासी परिक्रमेच्या मार्गातील जिल्ह्यांमध्ये आपले अनुयायी किंवा शिष्यांकडे मुक्कामी आहेत. ज्यांचे शिष्य नाही अशांसाठी संघ आणि विश्व हिंदू परिषदेने निवासाची व्यवस्था केली आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तयारी आणि सुरक्षा यंत्रणेचा खडा पाहारा.