आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेने प्रवास खूप केला असेल, चालकाच्या या वेदनांपासून मात्र असाल अनभिज्ञ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या कॅबिनमध्ये बसलेले रेल्वे ड्रायव्हर - Divya Marathi
आपल्या कॅबिनमध्ये बसलेले रेल्वे ड्रायव्हर
रांची - लक्झरी ट्रेन बद्दल तुम्ही खूप वाचले आणि पाहिले असेल, मात्र तुम्हाला माहित आहे का रेल्वेच्या ड्रायव्हरला टॉयलेटलाही जाता येत नाही. इंजिनमध्ये टॉयलेट नसते आणि स्टेशनवर आपल्या मर्जीने तो ट्रेन थांबवू शकत नाही. नाईलाजाने त्यांना तासन्-तास 'नॅचरल कॉल' रोखून धरावा लागतो.

चाळीशीत अनेक आजारांनी ग्रासले जातात
हटिया-राऊरकेला मार्गावर चालणारे लोको पायलट विनोद उरांव यांनी सांगितले, इंजिनमध्ये टॉयलेटची व्यवस्था नसल्याने खूप त्रास होतो. नॅचरल कॉलवर नियंत्रण ठेवावे लागते. त्यामुळे ड्रायव्हर्स चाळिशीत येईपर्यंत त्यांना अनेक आजारांनी ग्रासलेले असते. हा प्रश्न अनेकदा वरिष्ठांसमोर मांडला मात्र आतापर्यंत त्यावर उपाय सुचवण्यात आलेला नाही.

तज्ज्ञ म्हणतात, किडनीवर परिणाम होण्याची शक्यता
रांचीचे फिजीशियन डॉ. रंजन पांड्ये म्हणाले, 'नॅचरल कॉल रोखून धऱल्याने इन्फेक्शन होण्याची भीती असते. यामुळे किडनीवर परिणाम होण्याची शक्यता असते. चाळीशीनंतर प्रोस्टेट वाढायला लागते त्यामुळे नॅचरल कॉल रोखणे अवघड होऊन जाते. चालत्या ट्रेनमध्ये नॅचरल कॉल आल्याने रेल्वेच्या ड्रायव्हरचे लक्ष्य विचलीत होऊ शकते.' रांची रेल्वे मंडळात जवळपास 600 लोको पायलट आणि 5 महिला पायलट आहेत. हे कोणत्या ना कोणत्या पोटाच्या विकाराने त्रस्त आहेत.
'आय एम नॉट वेल' संदेश पाठवला जातो
रांची रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी निरजकुमार यांनी सांगितले, चालत्या ट्रेनमध्ये नॅचरल कॉल आल्यानंतर चालक पुढील स्टेशनला आय एम नॉट वेल असा संदेश पाठवतात. त्यानंतर त्या स्टेशनवर त्यांच्या शौचाची व्यवस्था केली जाते. अशा वेळी रेल्वे सेफ लाइनमध्ये उभी केली जाते, ज्यामुळे दुसऱ्या रेल्वेंना अडथळा होणार नाही.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधित फोटोज्...