आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळ्यासमोर आई वाहून जात होती, अशी झाली मुलीची अवस्था; नदी पार करताना झाली दुर्घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोळ्यासमोर आई वाहून गेल्यानंतर ओक्साबोक्सी रडताना मुलगी. - Divya Marathi
डोळ्यासमोर आई वाहून गेल्यानंतर ओक्साबोक्सी रडताना मुलगी.
रामगड (झारखंड) - डोळ्यांदेखत स्वतःच्या आईला नदीत वाहून जात असताना पाहून मुलीची रडून-रडून वाईट अवस्था झाली. सततच्या पावसामुळे राज्यातील अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी छिन्नमस्तिका मंदिर येथील भैरवी नदीला पुर आला. यात 12 जण वाहून गेले, त्यात कावंरिया नावाच्या एक महिलेचा समावेश आहे. पुलावरुन वेगाने पाणी वाहात होते, त्यानंतरही महिला तिच्या मुलीसह पुल पार करुन जाण्याचा प्रयत्न करत होती, त्याचवेळी ही दुर्घटना घडली.

- स्थानिकांनी सांगितले की बुधवारी नदीचे पाणी पुलावरुन वाहात होते. पहिल्या घटनेत दोन पुरुष आणि त्यांच्यासोबतच्या पाच महिला कांवडिया भैरवी नदीवरील छिलका पुल पार करताना वाहून गेल्या.
- त्यावेळी पाणी जास्त खोलवर नसल्यामुळे त्यांना लागलीच वाचवण्यात आले.
- त्यानंतर दुसरी घटना याच पुलावर घडली. सकाळी साधारण 11 वाजता पाच महिला कावंडिया भैरवी नदीवरील पुलावरुन जात होत्या.
- लोकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याच्या वेगवान प्रवाहातही महिला पुलावरुन निघाल्या.
- पुलाच्या मधोमध पोहोचल्यानंतर मंजू देवी या महिलेचा पाय घसरला आणि ती तिच्या 25 वर्षांच्या मुलीसह प्रवाहासोबत वाहात गेली.
- घटनेच्या जवळपास एका तासानंतर नदीच्या संगमस्थळी महिलेचा मृतदेह सापडला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, भैरवी नदीचा पूर आणि घटनास्थळावरील फोटो
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तरURLम्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...