आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातून मंदिरात जाण्यासाठी निघाली होती तरुणी, रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात होता मृतदेह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची - मंदिरात जाण्यासाठी निघालेल्या 24 वर्षांच्या तरुणीचा मृतदेह रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे कुटुंबीयांना कळाले. सोमवारी रात्री रिंपीकुमारी प्रमाणिकची हत्या करण्यात आली होती. मंगळवार पोस्टमॉर्टमनंतर समोर आले की गोळी मारुन तरुणीची हत्या करण्यात आली. रिंपी कुमारीचे लग्न ठरले होते आणि घरात लग्नाची तयारी सुरु होती, या दरम्यान तिची हत्या झाल्याने हे कोणी केले असा प्रश्न सर्वांना पडला आहे. पोलिसांनी एक विशेष टीम तयार करुन तपास सुरु केला आहे.
काय आहे प्रकरण
- रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला रिंपी कुमारीच्या मृतदेहाकडे लोकांचे लक्ष्य गेले. त्यांनी तत्काळ तिला हॉस्पिटलमध्ये पोहोचवले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मंगळवारी पोस्टमॉर्टमनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
- पोलिसांच्या माहितीनुसार, रिंपी घरातून सँडल घालून मंदिरात जाण्यासाठी निघाली होती. मात्र जेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तेव्हा तिच्या पायात सँडल नव्हती.
- रिंपी च्या पायाला चिखल लागलेला होता. त्यावरुन पोलिसांनी अंदाज लावला आहे की गोळी लागण्याआधी रिंपी जीव वाचवण्यासाठी पळाली असेल.
- हल्लेखोराने तिला पळत-पळत पकडले असेल. त्यानंतर रिंपी ला बगलेत दाबून तिच्यावर गोळी झाडली असणार.
- प्राथमिक चौकशीतून समोर आले की रिंपी ची हत्या कुटुंबातील किंवा परिचत व्यक्तींपैकीच कोणी केली असण्याची शक्यता आहे.
- रिंपी रांची महिला महाविद्यालयात शिक्षण घेत होती. हल्लेखोर तिला कॉलेजमध्येही भेटायला येत होता. काही कारणामुळे त्यांच्यात मनमुटाव झाला होता.
- रिंपी चा मोठा भाऊ शेखर प्रामाणिक ठेकेदार असून त्यानेही मान्य केले आहे की या परिचीत व्यक्तीचे घरी येणे-जाणे होते. वास्तविक पोलिस प्रत्येक अँगलचा बारकाईने विचार करत आहे.
पुढील स्लाइडमध्ये इन्फोग्राफिक्समधून समजून घ्या रिंपी प्रामाणिक खून प्रकरण...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...