आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAK गोळीबारात शहीद सुधीशच्या वडिलांचा पवित्रा- CM येतील तेव्हाच अंत्यसंस्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संबळ (उत्तर प्रदेश) - शहीद जवान सुधीश कुमारच्या वडिलांनी मुलाच्या अंत्यसंस्कारास नकार दिला आहे. धर्मपाल यांचे म्हणणे आहे, की मुख्यमंत्री अखिलेश यादव आल्याशिवाय शहीद मुलाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार नाही. पाकिस्तानी सैनिकांनी 16 ऑक्टोबरच्या सायंकाळी जम्मू-काश्मीरमधील नौशेरा येथे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. त्यात सुधीश शहीद झाले होते.

मुख्यमंत्र्यां 20 लाखांची मदत
- शहीद सुधीश यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी त्यांचे मुळ गाव पंसुखा येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
- अंत्यसंस्कारासाठी जमा झालेल्या नागरिकांमध्ये पाकिस्तान विरोधात संताप आहे. लोक पाकिस्तान आणि नवाज शरीफ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आहेत.
- शहीद जवानाच्या वडिलांनी मुख्यमंत्री अखिलेश यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला. ते म्हणाले, की त्यांच्याकडे मथुरेला जाण्यासाठी वेळ आहे, मग इकडे का येत नाही ?
- सुधीश यांच्या कुटुंबीयांनी पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी केली आहे. बदल्याशिवाय हा राग थंड होणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
- शहीद सुधीश यांचे वडिल धर्मपाल म्हणाले, मुलाच्या जाण्याचे दुःख आहे, मात्र तो देशाच्या सेवेत आला याचा अभिमानही आहे.
- मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी शहीद सुधीश यांच्या कुटुंबाला 20 लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे.
बातम्या आणखी आहेत...