हैदराबाद - हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील (एचसीयू) तणाव पुन्हा वाढला आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी बुधवारी सकाळी विद्यापीठ परिसरात प्रवेशासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांना प्रवेशद्वारावरच रोखले. ४० विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. विविध संघटनांचे विद्यार्थी या आंदोलनात सहभागी होते. विद्यापीठाच्या कुलगुरूंना अटक करा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. परीक्षा नियंत्रक प्रोफेसर व्ही. कृष्णा यांनी आंदोलनकर्त्यांना पाठिंबा जाहीर केला. ‘कुलगुरू राव हटाव’ला परीक्षा नियंत्रकाने पाठिंबा देत पदाचा राजीनामाही दिला. अकॅडमिक कॉन्सिलच्या बैठकीतून कृष्णा यांनी वॉकआउट केले. ‘चलो एचसीयू’चा नारा देत विविध संघटनांनी विद्यापीठ प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले. यासाठी संयुक्त कृती समिती गठित करण्यात आली होती. अप्पा राव पोडिले यांना कुलगुरू पदावरून काढावे व अटक करावी, अशी जोरदार मागणी या समितीने केली. विद्यापीठ परिसरात प्रवेशासाठी अनेक आंदोलनकर्ते प्रवेशद्वारावर चढले.
येथे मोठ्या प्रमाणात पोलिस दल तैनात होते. त्यांनी आंदोलनकर्त्यांना रोखले व प्रतिबंधात्मक कोठडीत टाकले.
पुढील स्लाइडमध्ये,
एचआरडीचे पथक श्रीनगर एनआयटीत दाखल