आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Law Undergraduates Rape Girl On Haryana University Campus News In Marathi

लॉ कॉलेजच्या कॅम्पसमध्ये प्रेयसीवर प्रियकरासह तिघांनी केला सामुहीक बलात्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंडीगड- हरियाणातील सोनीपतमध्ये एका लॉ कॉलेजच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थिनी तिच्या प्रियकरासह त्याच्या अन्य दोन मित्रांनी बलात्कार केला. एवढेच नव्हे तर पीडितेचे अश्लील फोटो इंटरनेटवर अपलोड करण्‍याची धमकीही आरोपी देत होते. पीडितेला ब्लॅकमेल करून आरोपींनी वारंवार तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. सोनीपतमधील एका खासगी कॉलेजमध्येही घटना घडली असून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पीडितेने पोलिसांना सांगितले की, 2013 मध्ये तिने लॉ कॉलेजात प्रवेश घेतला. दरम्यान, एका सीनियरसोबत तिची मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. नंतर आरोपीने पीडितेची ओळख त्याच्या दोन मित्राशी करून दिली. नंतर तिन्ही आरोपींनी तिला विश्वासात घेऊन कॉलेज कॅम्पसमध्ये आळीपाळीने सामुहीक बलात्कार केला. एवढेच नव्हे तर त‍िचे फोटो काढले. फोटो इंटरनेटवर अपलोड करू अशी धमकी देऊन तिला ब्लॅकमेल केले. रात्री 10 वाजेनंतर पीडितेला कॅम्पसमध्ये बोलवून आरोपी तिच्यावर बलात्कार करत होते.

दुसरीकडे, आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे. तिन्ही आरोपींना तडकाफडकी कॉलेजमधून काढून टाकण्यात आले. मात्र, रात्री 10 वाजेनंतर कोणत्याही विद्यार्थ्याला हॉस्टेलमधून बाहेर जाण्यास परवानगी दिली जात नसल्याचे लॉ कॉलेजच्या सूत्रांनी म्हटले आहे.