आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काहींना बिहारची प्रतिमा बिघडवण्यातच आनंद, मुख्यमंत्री नितीशकुमार यांची नेत्यांवर टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - प्रकाश पर्व समारंभात राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना जमिनीवर बसवल्याबद्दल जे लोक टीका करत आहेत त्यामुळे बिहारची प्रतिमा खराब होत आहे, असे मत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोमवारी व्यक्त केले.

लोकसंवाद कार्यक्रमात राजद नेते रघुवंश प्रसाद सिंह आणि भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांचे नाव न घेता नितीशकुमार म्हणाले की, काही लोक बिहारची प्रतिमा बिघडवण्याचा प्रयत्न करतात. त्यातच त्यांना आनंद मिळतो. बिहारमध्ये प्रकाश पर्वसारखा कार्यक्रम एवढा यशस्वीपणे कसा संपन्न झाला, हे अशा लोकांना खटकते. लोकही तऱ्हेवाईक आहेत. राजद अध्यक्ष लालूंना जमिनीवर बसवले असे ते म्हणत आहेत.  काहीही आगापिछा नसणाऱ्या लोकांना लालूंनीच उत्तर दिले आहे. तसे पाहिले तर गुरू दरबारमध्ये सर्व लोक जमिनीवरच बसतात. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या कार्यक्रमात मंचावर कोण बसेल हे दिल्लीतूनच ठरले जाते. त्यात राज्य सरकारची कुठलीही भूमिका नसते. हा कार्यक्रम बिहार सरकारचा नव्हताच. त्याचे आयोजन गुरुद्वारा प्रबंधक समितीने केले होते. कितीही चांगले झाले तरी काही लोक त्यात काही ना काही खुसपट काढतातच. अशा लोकांनी स्वत:मध्ये काही सुधारणा करणे आवश्यक आहे. ते जर असा बदल घडवून आणू शकले नाहीत तर बिहार दुसऱ्या दिशेने जात आहे, हे त्यांनी समजून घ्यावे. 

नितीशकुमार म्हणाले की, प्रकाश पर्वासाठी जेवढे लोक पाटण्याला आले त्या सर्वांनीच आयोजनाची स्तुती केली. पंजाबमधील तीन प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीही असे आयोजन आपण पाहिले नाही, असे एका सुरात म्हटले आहे.
 
बातम्या आणखी आहेत...