आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेफ्टनंट जनरल नावीद मुख्तार आयएसआयचे प्रमुख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद | पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी रविवारी मोठा फेरबदल केला. त्यांनी आयएसआय या पाकिस्तानच्या गुप्तचर संघटनेचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रिझवान अख्तर यांना हटवले. पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी रात्री उशिरा लेफ्टनंट जनरल नावीद मुख्तार यांना आयएसआयचा नवा महासंचालक म्हणून नियुक्त करण्यास मंजुरी दिली.

रिझवान अख्तर यांची आता नॅशनल डिफेन्स स्कूलचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. त्या पदावर असलेले लेफ्टनंट जनरल नाजीर भट्ट यांना ११ वी कोअर पेशावरचे कोअर कमांडट म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या कोअरचे आधीचे कमांडर लेफ्टनंट जनरल हिदायत उर रहमान यांना प्रशिक्षण आणि मूल्यमापन विभागाचे महानिरीक्षक करण्यात आले आहे. अलीकडचे पदोन्नती झालेले लेफ्टनंट जनरल बिलाल अकबर यांना चीफ ऑफ जनरल स्टाफ करण्यात आले आहे
बातम्या आणखी आहेत...