आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Left Front Requests PM For Declassification Of Netaji's Files

नेताजींचे दस्तऐवज उघड करा : डावे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - पश्चिम बंगालमधील डाव्या पक्षाच्या नेत्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या गुप्त कागदपत्रांना उघड करण्याची मागणी केली आहे.

२३ जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस देशप्रेम दिन म्हणून साजरा करण्याची मागणी डाव्या नेत्यांनी केली आहे. याविषयीचे निवेदन पत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले असून पक्षाचे राज्य अध्यक्ष बिमान बोस यांनी नेताजींच्या गुप्त कागदपत्रांच्या रहस्याचा उलगडा करण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली आहे. यासंबंधीचे पत्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनाही देण्यात आले आहे.

यापूर्वीही संसदेत नेताजी, त्यांच्या आझाद हिंद सेनेविषयीच्या कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती. नेताजींच्या अचानक गायब झाल्याचे रहस्यही यामुळे उलगडेल , अशी आशा बोस यांनी व्यक्त केली. यूपीए सरकारने या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याची टीका बिमान बोस यांनी केली.