आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मिरात सुरक्षा रक्षक, दहशतवाद्यांमध्ये चकमक; लश्करच्या 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेफ्टनेंट फयाज शहीद झाल्यानंतर काश्मिरात दहशतवाद्यांच्या शोधून काढण्याच्या मोहिमेला वेग आला आहे. (फाईल) - Divya Marathi
लेफ्टनेंट फयाज शहीद झाल्यानंतर काश्मिरात दहशतवाद्यांच्या शोधून काढण्याच्या मोहिमेला वेग आला आहे. (फाईल)
श्रीनगर - जम्मू-कश्मिरच्या हंदवाड़ा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी दुपारी अचानक चकमक उडाली आहे. कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा परिसर-वारिपोरा गावात लश्कर ए-तोयबाचे दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने परिसरात शोध मोहिम राबवली असता सुरक्षा रक्षकांवर गोळीबार करण्यात आला. याचवेळी उडालेल्या चकमकीत 2 दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहेत. 
 
लेफ्टनेंट फयाज यांच्या हत्येनंतर शोध मोहिमेला वेग
- शोपियां परिसरात 9 मे रोजी लष्कराचे लेफ्टनेंट उमर फयाज यांचा दहशतवाद्यांनी निर्घृण खून केला. फयाज शहीद झाल्यानंतर काश्मिरात दहशतवाद्यांच्या शोधून काढण्याच्या मोहिमेला वेग आला आहे. 
- शनिवारी लष्कराने दक्षिण काश्मिरात 100 हून अधिक दहशतवादी लपल्याचे सांगितले होते. त्यांनाच पकडण्यासाठी परिसरात मोहिम सुरू होती. यापैकी 7 दहशतवाद्यांना लष्कराने पकडले आहे. 
- लेफ्टनेंट उमर यांच्या खून प्रकरणात हिज्बुलच्या दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय आहे. दहशतवाद्यांनी त्यांचे विवाहातूनच अपहरण केले होते. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह सापडला. 
बातम्या आणखी आहेत...