आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LET Terrost Arrested At Jammu Kashmir In Politicians Home

राजकीय नेत्याच्या घरातून LETच्या दहशतवाद्याला अटक, पोलिस होते संरक्षणाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील एका राजकीय नेत्याच्या घरातून एका दहशतवाद्याला पोलिसांनी अटक केले. अबी मावया असे त्याचे नाव असून तो पाकिस्तानातील 'लष्कर-ए-तैय्यबा' या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. बारामूला जिल्ह्यातील सरपंच फारुख अहमद बट यांच्या घरातून अबीला अटक केली आहे.

अबीकडून एक बंदूक आणि काही विस्फोटके पोलिसांनी जप्त केली आहेत. अबी मावया याला फारुख याच्या घरात पोलिस संरक्षण दिले जात होते, अशी धक्कादायक माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फारुख अहमद बट हा सरपंच असून त्याच्या घरात दहशतवादी अबी मावया याने आश्रय घेतला होता. विशेष म्हणजे अबीला संरक्षण देण्यासाठी फारुख याने तीन पोलिस कर्मचार्‍यांची मदत घेतली होती. त्यात फारुखचा एक नातेवाईक आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत फारुखचा पराभव झाला होते. नॅशनल पॅंथर्स पक्षाच्या तिकिटावर त्याने बारामूला जिल्ह्यातील संगरामा विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवली होती.

पाकिस्तानी दहशतवादी एका राजकीय नेत्याच्या घरात लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सोपोर पोलिस आणि लष्कराने ही कारवाई केली.
फारूख अहमद भट याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरु आहे. फारुखला मदत करणार्‍या तिन्ही पोलिस कर्मचार्‍यांना तडकाफडकी निलंबित करण्‍यात आले आहे.