आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lets See How Many Get Relief Package mamta Banargi

पूरग्रस्तांना किती पॅकेज मिळते पाहूया, ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता- ‘पूरग्रस्तांना यंदा केंद्राकडून किती पॅकेज मिळते, हे पाहूया’, अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन पूरग्रस्तांसाठी राज्याला २१०० कोटी रुपयांचे पॅकेज मिळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारकडून ही अपेक्षा व्यक्त केली.
मोदी यांची भेट घेऊन गुरूवारी त्यांचे कोलकात्यात आगमन झाले. मागील भेटीत मी त्यांच्याकडे पूरग्रस्तांसाठी मोठी मदत मिळावी, अशी मागणी केली होती. त्याचीच पुनरावृत्ती या भेटीत केली आहे. आता पाहूया त्यांच्याकडून किती सहानुभूती दाखवण्यात येते ? त्यांनी बुधवारी मोदींना राज्याच्या वतीने निवेदन सादर केले. त्या व्यतिरिक्त ममता यांच्याकडून काहीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. राज्यात पूरग्रस्त नागरिकांची संख्या मोठी आहे.

दरम्यान, निती आयोगाची एक बैठक बोलावण्यात यावी. त्यात देशातील सर्व मुख्यमंत्ऱ्यांना सहभागी करून घेण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी पंतप्रधानांकडे केली. दिल्ली दौऱ्यात ममतांनी काँग्रेसला विरोध करण्यासाठी इतर सहकारी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीलाही हजेरी लावली होती. त्यामुळे राजकीय वादळ आले.