आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपतींनी परतवली फाइल, दिल्लीत सरकार कोणाचे? यावर उपराज्यपाल घेणार निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये कोणाचे सरकार येणार याबाबतचा निर्णय राष्ट्रपतींनी उपराज्यपाल नजीब जंग यांच्यावर सोडला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कोणताही सल्ला न देता फाइल गृह मंत्रालयाकडे परत पाठवली आहे. आगामी 10 ऑक्टोबरला दिल्लीमध्ये सरकार स्थापनेच्या संदर्भातील याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. नजीब जंग यांना त्यापूर्वी निर्णय घ्याला लागणार आहे. दरम्यान, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ट्वीटमुळे दिल्लीचे तापमान आणखी वाढले आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता सर्व निर्णय उपराज्यपालांच्या हातात आहेत. राष्ट्रपतींच्या या निर्णयाने भाजपलाही मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे उपराज्यपाल नजीब जंग यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून दिल्लीत नव्या सरकारच्या स्थापनेसंदर्भात निर्णय घेण्याची परवानगी मागितली होती. नजीब जंग यांनी सत्ता स्थापनेसाठी सुरू केलेल्या प्रक्रियेबाबत 10 ऑक्टोबरला निर्णय घेणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते.


दिल्लीतील सत्तेचे गणित
70 सदस्य असणा-या दिल्ली विधानसभेत भाजपला 31 जागांवर विजय मिळाला होता. पण आता त्यांच्या सदस्यांची संख्या 28 वर आली आहे. त्यांचे तीन आमदार लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यामुपळे आमदारांची संख्या घटली आहे. त्यामुळे विधानसभेतील सदस्यांची संख्याही 67 वर आली आहे. दिल्लीत सत्ता स्थापनेसाठी 36 आमदारांची गरज असते. तर सद्यस्थितीनुसार 34 आमदारांची गरज आहे.
पुढे वाचा, ट्वीटमधून काय म्हणाले अरविंद केजरीवाल