आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैलगाडीसाठी आता ड्रायव्हिंग लायसन्स आवश्‍यक, केंद्राच्या रस्ते विधेयकात तरतूद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोटा - देशात घोडागाडी आणि बैलगाडीसारखी वाहने चालवण्यासाठीही आता विशेष परीक्षा द्यावी लागेल. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय रस्त्यावर घोडागाडी किंवा बैलगाडी चालवता येणार नाही. केंद्र सरकारच्या रस्ते आणि वाहतूक सुरक्षा विधेयकात ही तरतूद करण्यात आली आहे. बैलगाडी चालकांना ड्रायव्हिंग लायसन्सच्या स्वरूपात एक प्रमाणपत्र देण्यात येईल. या गाड्या मग भाड्यानेही देऊ शकणार नाहीत. नव्या विधेयकाच्या परिशिष्ट ‘अ’मध्ये ही तरतूद केली आहे.

बैलांनी ऐकले तरच परवाना
दोन तासांच्या परीक्षेत मौखिक व प्रात्यक्षिक असेल. मौखिक परीक्षेत वाहतुकीचे नियम, चिन्हे आदी माहिती तर प्रात्यक्षिकात बैल मालकाचे किती ऐकतो, हे पाहिले जाईल. त्यात चालणे, थांबणे आणि वळणे या बाबींचा समावेश असेल.

वयाची अट २० वर्षे
बैलगाडीसारख्या दोनचाकी वाहनांचा कोणी व्यावसायिक वापर करत असेल तर चालकाचे वय कमीत कमी २० वर्षे असणे सक्तीचे करण्यात आले आहे.