आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lie Detector Test In Rohtak Molestation Case Boys Pass Girls Doubted

बसमध्ये मारहाणः लाय डिटेक्टर टेस्टमध्ये आरोपी पास, तर मुलींची उत्तरे संशयास्पद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक - काही महिन्यापूर्वी हरियाणाच्या रोहतक शहरातील एका सरकारी बसमध्ये छेडछाड केल्यावरून तीन तरूणांना दोन बहीणींनी बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या पॉलीग्राफ टेस्टचा अहवाल मंगळवारी लिक झाला. या अहवालानुसार सेंट्रल फॉरेन्सिक लॅबमध्ये तरूणांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ही खरी ठरली, तर मुलींना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ही संशयास्पद होती.
अहवालातून मिळालेल्या माहितीनंतर आरोपी पक्षाने आपण निर्दोष आहोत हे आम्हाला पहिलेच माहीत होते असे म्हटले आहे. तर मुलींच्या पक्षाने अहवाल न मिळाला नाही असे सांगितले. तसेच कोर्टाच्या नजरेत या पॉलिग्राफ टेस्टचे काहीच महत्त्व नाही आणि हा अहवाल या खटल्यातील महत्त्वाची बाजू ठरू शकत नाही, असे म्हटले आहे.

45 मिनिटांत 12 प्रश्न, हो आणि नाही मध्येच होते जास्त उत्तरे
एसआयटी टीमने या प्रकरणी तपासात अधीक गती यावी यासाठी कोर्टाच्या संमतीने दोन्ही पक्षांची पॉलीग्राफ टेस्ट केली. 18 आणि 19 डिसेंबरला नवी दिल्ली येथील सेंट्रल फॉरेंसिक लॅब येथे तीन्ही आरोपी तरुणांचे, तर 22 डिसेंबरला दोन्ही पिडीत बहिणींचे पॉलीग्रफ टेस्ट करण्यात आले. या तीन्ही आरोपींची पहिलेच सायकोलॉजीकल ब्रॅन मॅपींग करण्यात आली होती, तसेच 45 ते 60 मिनिटांपर्यंत आळीपाळीने तीन्ही तरुणांना लाय डिटेक्टर मशीनवर ठेवण्यात आले.

या दरम्यान मुख्य आरोपी कुलदीपला 45 मिनिटांपर्यंत बारा प्रश्न विचारले गेले. यामध्ये हो अथवा नाही अशा शब्दात उत्तर द्यायचे होते. मुलीकडे चिठ्ठी फेकणे, छेडछाड करणे, मारामारी सुरू करणे, बसस्टँडवर ओढाओढी करणे, तसेच रोहतक शहरात राहाण्यासंबंधीचे यात प्रश्न विचारण्यात आले होते. यातील अनेक प्रश्नांचे उत्तर कुलदीपने नाही अशा स्वरूपात दिले.
क्लीनचिट नाही, केवळ आरोपींकडे झुकले पारडे
पॉलीग्राफ टेस्टमध्ये दोन्ही पक्षांचे दोन दोन टेस्ट झाले आहेत. पहिले त्यांचा सायकोलॉजिकल टेस्ट झाला, त्यानंतर लाय डिटेक्टर मशीनची टेस्ट झाली. या टेस्टच्या एका आठवड्यानंतर म्हणजेच 31 डिसेंबरला हा अहवाल एसआयटीला सुपूर्द करण्यात आला. मात्र दुसऱ्या टेस्टचा अहवाल आला नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायकोलॉजिकल टेस्टचा अहवाल एक आठवड्यापूर्वीच मिळाला होता. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुलांना क्लिनचीट अद्याप देण्यात आलेली नाही. अहवालानुसार या प्रकरणी मुलांची बाजू खरी आहे, तर मुलींची उत्तरे संशयास्पद आहेत.

पुढील स्लाईडवर, आम्हाला माहित होते की आम्ही निर्दोष आहोत... आणि शेवटच्या स्लाईडवर पाहा या घटनेचा VIDEO