आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाेपाळ-मुंबई विमानात प्रवाशाकडे सापडले जिवंत काडतूस; तीन दिवसांतील दुसरी घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाेपाळ- राजा भोज विमानतळावर  मंगळवारी सकाळी सात वाजता एअर इंडियाच्या भाेपाळ-मुंबई विमानातून प्रवास करत असलेल्या एका प्रवाशाकडे काडतुसे सापडली.  विमानात प्रवाशाकडे जिवंत काडतुसे सापडल्याची तीन दिवसांतील ही दुसरी घटना आहे.  


सीआयएसएफने त्याला गांधीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची तुरुंगात रवानगी केली. याअाधीही रविवारी रात्री भोपाळ-दिल्ली विमानातून प्रवास करणाऱ्या हसनेन अहमद याच्याकडे २० काडतुसे सापडली. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता काडतुसे दिल्लीहून भोपाळला आणली होती, अशी माहिती त्याने दिली. तथापि, विमानातून काडतुसे नेणे  शक्य नसल्याचा एअर इंडियाचा दावा आहे.  


चेकइन करताना पँटच्या खिशात सापडली काडतुसे : भाेपाळ येथील ३० वर्षीय उमेरउद्दीन यांचा अरब अमिरातमध्ये व्यवसाय आहे. मंगळवारी आंतरराष्ट्रीय विमान पकडण्यासाठी ते मंुबईला जात होते. उमेरने एअर इंडियाच्या मुंबईला जाणाऱ्या  विमानासाठी सकाळी ७ वाजता ते विमानतळावर आले. तेव्हा बॅगेत असलेल्या पँटमध्ये ७.६५ बोअरचे एक जिवंत काडतूस सापडले. सीआयएसएफने प्रवाशास गांधीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. 

 

प्रवासी खोटे बोलतोय  
एअर इंडियाच्या विमानातून दिल्लीहून आलेल्या प्रवाशाकडे रिव्हॉल्व्हरची २० काडतुसे विमानात आल्याची माहिती चुकीची आहे. प्रवासी खोटे सांगताे आहे.  
-विश्रुत आचार्य, जीएम, एअर इंडिया, एमपी, छत्तीसगड 

 

चौकशी सुरू आहे  
प्रवाशाकडे पिस्तुलातील काडतुसे सापडली आहेत. दिल्लीच्या प्रवाशाकडे काडतुसे  येथे कशी आली याची चौकशी सुरू आहे.   
-समीर यादव, एएसपी झोन ४  

बातम्या आणखी आहेत...