आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळावरील जीवसृष्टीच्या अस्तित्वाचा शोध भारतीय उपग्रह घेणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - मंगळ ग्रहावर जीवसृष्टी अस्तित्वात येण्यासाठी आवश्यक असलेले मिथेन आहे की नाही, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न भारताच्या आगामी मंगळ प्रदक्षिणा मोहिमेत केला जाणार आहे, अशी माहिती भारताच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे प्रकल्प संचालक एस. अरुणन यांनी दिली.


इस्रोकडून मंगळ मोहिमेवर पाठवण्यात येणा-या अंतराळ यानावर बसवण्यात येणा-या पाच महत्त्वाच्या वैज्ञानिक उपकरणांपैकी मिथेन सेन्सर हे एक महत्त्वाचे उपकरण असून त्याच्यामार्फत मंगळावरील मिथेन वायूचा शोध घेतला जाणार आहे. मंगळावर जीवन अस्तित्वात होते काय किंवा भविष्यात ते अस्तित्वात येण्याची शक्यता आहे काय? याची पडताळणी हे मिथेन सेन्सर करणार आहे. मंगळावर मिथेन असेल तर हो आणि नसेल तर नाही, असे स्पष्ट उत्तर देऊन ‘दूध का दूध, पानी का पानी’ करण्यात आम्हाला हमखास यश मिळण्याची शक्यता आहे, असे इंडियन रिमोट सेन्सिंग अँड स्मॉल, सायन्स अँड स्टुडंट सॅटेलाइट्सचे (आयआरएस आणि एसएसएस) प्रकल्प संचालक एम. अण्णादुराई यांनी सांगितले. माध्यम प्रतिनिधींनी इस्रोच्या उपग्रह केंद्राला भेट दिली त्या वेळी ते बोलत होते.


अशी आहे मोहीम
०450 कोटी रुपये एकूण खर्च
०110 कोटी रुपये पीएसएलव्ही-सी25 च्या बांधणीवर
०150 कोटी रुपये खर्चून अंतराळ यानाची निर्मिती
०21 ऑक्टोबर रोजी श्रीहरिकोटा येथून अंतराळयान मोहिमेवर सोडणार
०20 ते 25 दिवस अंतराळ यान पृथ्वीच्या कक्षेतच प्रदक्षिणा घालणार
०9 महिन्यांचा प्रवास करून मंगळाच्या कक्षेत भारताचे पहिले पाऊल.