आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुरुंगात राहून बाॅम्बस्फोटाचा कट रचणाऱ्या 8 अतिरेक्यांना जन्मठेप; जयपूर कोर्टाचा निकाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजस्थानी : अरुण जैन, नागौर, हाफिज अब्दुल मजिद (झालावाड), काबिलखान (झालावाड), पवन पुरी, उदयपूर, निशा चंद्र अली, बिकानेर पाकिस्तानी : असगर अली, शकरउल्ला, महंमद इक्बाल - Divya Marathi
राजस्थानी : अरुण जैन, नागौर, हाफिज अब्दुल मजिद (झालावाड), काबिलखान (झालावाड), पवन पुरी, उदयपूर, निशा चंद्र अली, बिकानेर पाकिस्तानी : असगर अली, शकरउल्ला, महंमद इक्बाल

जयपूर- दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या ८ अतिरेक्यांना जयपूरच्या एका न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. यामध्ये तीन पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे. या दहशतवाद्यांनी तुरुंगात असताना स्फोटाचा कट रचणे व लष्कर-ए-तोयबाचे सदस्य बनवले या गुन्ह्यात दोषी मानले. 


न्यायालयाने या सर्वांना ११-११ लाखांचा दंड ठोठावला आहे. राजस्थान एसटीएफने २०१० व २०११ मध्ये या आरोपींना पकडले होते. बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी ज्यांना शिक्षा ठोठावली, त्यामध्ये अरुणकुमार जैन, नागौर, हाफिज अब्दुल मजिद व काबिल खान, झालावाड व पवन पुरी, उदयपूर यांचा समावेश आहे. ही मंडळी फोनवरून दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होती.

 

पाच आरोपी राजस्थानातील आणि ३ पाकिस्तानी; कट रचल्यावरून न्यायालयाने ठरवले दोषी

२१ ऑक्टोबर २०१० रोजी एसटीएफने एफआयआर दाखल केला. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर वलिद ऊर्फ विक्की भाई  जोधपूर तुरुंगात असलेला पाकिस्तानी गुप्तहेर असगर अली, पंजाबच्या नाभा तुरुंगातील पाक दहशतवादी शकरउल्ला आणि अमृतसरच्या तुरुंगात असलेला पाक दहशतवादी शाहिद इक्बाल यांच्याशी टेलिफोनवरून संपर्कात होता. हा दहशतवादी राजस्थानातील काही लोकांना दहशतवादी कारवाया करणे, बॉॅम्बस्फोट घडवून आणणे आणि पाकिस्तानात जाऊन दहशतवादी प्रशिक्षण घेण्यासाठी चिथावणी देत होता. विक्कीच्या निर्देशावरून या दहशतवाद्यांना इतर आरोपींशी संपर्क साधून त्यांना दहशतवादी कारवाया करण्यास भाग पाडले. 

 

कलम १३ : देशाचे तुकडे पाडण्याचा कट,बेकायदेशीर कारवाया

- कलम १७ : बेकायदेशीर कारवायांसाठी पैसे गोळा करणे

- कलम १८ व १८ बी : गुन्हेगारी कट रचणे

-  कलम २० : दहशतवादी संघटनेचे सदस्य करणे

 

बिकानेर, नाभाचे तुरुंग अधीक्षक, जेलर यांच्या चौकशीचे अादेश

न्यायालयाने मान्य केले की, या प्रकरणात जिल्हा कारागृह, बिकानेर, जोधपूर, नाभा व पतियाळाचे तुरुंग अधीक्षक , तुरुंगाधिकारी व उच्चाधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा व बेशिस्त वर्तन दिसून आले. या संबंधात राज्याचे पोलिस महासंचालक व गृह सचिवांना आदेशाची प्रत पाठवावी आणि या प्रकरणात दिरंगाई करणाऱ्या तुरुंगाधिकाऱ्यांच्या विरोधात चौकशी करून अहवाल न्यायालयात सादर करावा.

बातम्या आणखी आहेत...