आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे आहे 21 हजार कोटींच्या मालकाचे घर, अनिल अंबानींनाही सोडले मागे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संप्रदा सिंह याचे गावातील घर... - Divya Marathi
संप्रदा सिंह याचे गावातील घर...

पटना- फोर्ब्स इंडियाद्वारे जारी करण्यात आलेल्या भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादित संप्रदा सिंह (43 व्या स्थानावर) यांनी अनिल अंबानींनाही (45 व्या स्थानावर) मागे सोडले आहे. 21 हजार कोटींपेक्षा अधिक संपत्तीचे मालक असणाऱ्या संप्रदा सिंह यांची एकेकाळी गावातील लोक खिल्ली उडवत होते. सुशिक्षित संप्रदा सिंह यांना शेती करतना पाहून गावातील लोक त्यांना 'पढ़े फारसी बेचे तेल, देखो रे संप्रदा का खेल' असे म्हणून चिडवत होते.


अनेक वर्षापासून गावातील घर पडीक....
- 91 वर्षाच्या संप्रदा सिंह यांचा जन्म बिहारच्या जबानाबाद जिल्ह्यातील मोदनंगज प्रखंड येथील ओकारी गावात एका शेतकरी कुटुंबात झाला.
- divyamarathi.com ची टीम त्यांच्या गावात पोहोचली. त्याच्या गावातील घराच्या दरवजाला कुलुप लावलेले आहे. गेट देखील बंद आहे. घराच्या दरवाज्याची अवस्था आणि भिंतिवर उगलेले गवत सांगते की अनेक वर्षापासून त्या घरात कुणीच राहत नाही. 
- गावातील लोकांनी सांगितले की, संप्रदा सिंह येथे 2004 मध्ये शेवटी आले होते. आता ते बिहारमध्ये आल्यास पटना येथील आपल्या घरी थांबतात.


शेती करायला गेले तर पडला दुष्काळ...
- संप्रदा सिंह यांचे वडिलांकडे 25 बीघा जमीन होती. शेजारी असलेले, देवेंद्र शर्मा आणि नवल शर्मा यांनी सागितले की,  संप्रदा शाळेत सुरूवातीपासूनच हुशार होते. घोसी येथील शाळेत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी बी कॉमची पदवी घेतली.
- शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते गावात आले आणि आधुनिक पद्धतिने शेती करू लागले. कडधान्य आणि गव्हाच्या शेतीऐवजी ते भाजीपाल्याची शेती करू लागले.
- शेती करण्यास सुरूवात केली तेव्हा पाण्याची सर्वात मोठी समस्या होती. पाऊस कमी झाल्यामुळे गावाजवळून वाहणाऱ्या फाल्गु नदीतही कमी पानी होते.
- संप्रदा यांनी व्याजाने पैसे काढून डीडल इंजिन विकत घेतले आणि त्याद्वारे भाजीपाल्यांना पाणी पूरवण्याचा प्रयत्न केला, परंतु, तो यशस्वी नाही झाला. त्याच वर्षी दुष्काळ पडला. माणसांना आणि जनावरांनाच पाणी मिळत नव्हते, तर पिकांना कोठून देणार.


शाळेत मुलांना शिकवले...
- शेती करू न शकल्याने संप्रदा सिंह यांनी एका खाजगी हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी केली. त्याना अतिशय कमी पगार होता, त्यातून घर चालवने अवघड होते.
- काही काळ मुलांना शिकवून त्यांनी शिक्षकाची नोकरी देखील सोडली आणि पटना येथे जाऊन व्यावसाय करण्याचा निर्णय घेतला.


छत्रीचे दुकान टाकले...
- पटना येथे आल्यानंतर संप्रदा सिंह यांनी बीएन कॉलेजजवळ रस्त्यावर छत्रीचे दुकान सुरू केले. हा व्यावसाय करताना त्यांच्या लक्षात आले की, केवळ उन्हाळ्यात आणि पावसातच हा व्यावसाय चालेल. त्यातून खुप कमी इनकम मिळत होती.
- ते काम सोडून त्यांनी एका औशधीच्या दुकानात काम करण्यास सुरूवात केली. व्यवहार चातूर्यामुळे पीएमसीएचच्या डॉक्टरांसोबत संप्रदा सिंह यांचा चांगला संपर्क झाला.
- त्यानंतर त्यांनी  लक्ष्मी पुस्तकालायाचे मालक लक्ष्मी शर्मा याच्यासोबत मिळून औषधीचे दुकान सुरू केले. दवाखाण्यात औषधी सप्लाय करण्याचे काम ते करू लागले.
- दुकान चांगले सुरू होते, परंतु काही कराणावरून दोघांमध्ये वाद झाला. लक्ष्मी शर्मा यांना वाटत होते की, कमी उधार देऊन व्यावसाय करावा, तर संप्रदा यांना वाटत होते, की जास्तीत जास्त उधार देऊनच व्यावसाय आढू शकतो.
- लक्ष्मी सर्मा यावर सहमत झाले नाही. त्यानंतर दोघे वेग-वेगळे झाले. यानंतर संप्रदा सिंह यांनी आपल्या मित्रांकडून पैसे घेऊन स्वत:ची दुकान अल्केम फार्मा सुरू केले.
- कंपन्यांकडून औषधी घेऊन त्यांना संपूर्ण बिहारमध्ये सप्लाय करण्यास सुरूवात केली. ती औषधांची एजंसी चागंली सुरू होती परंतु, संप्रदा सिंह एवढ्यावर समाधानी होणाऱ्यातील नव्हते. आपल्या स्वप्नांना पंख देण्यासाठी ते मुंबईला आले.


एक लाख रूपयांत सुरू केली कंपनी...
- संप्रदा सिंह एक लाख रूपये घेऊन मंबईला आले आणि येथे त्यांनी औषधी कंपनी सुरू केली. येथेही लोकांनी त्यांची खिल्ली उडवली. एका लाखात औषधांची कंपनी कशी सुरू होऊ शकते असे लोक त्यांना म्हणत होते.
- लोकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी अल्केम नावाची कंपनी सुरू केली आणि दुसऱ्याच्या औषथी फॅक्ट्रीतून आपले औषध बनवण्यास सुरूवात केली.
- डॉक्टरांशी संबंध चांगले असल्याने संपूर्ण बिहारमध्ये त्याचे औषधी मोठ्या प्रमाणात विकू लागल्या. औषधींची मागणी एवढी वाढली की संप्रदा सिंह यांनी आपली स्वत:ची औषधी फॅक्ट्री सुरू केली. येथून त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.


फोटो- विवेक कुमार
पुढील स्लाइडवर पाहा अन्य फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...