आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हवाई दलाला ‘तेजस’ पंख ; भारतात विकसित लढाऊ विमाने आता सज्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वृत्तसंस्था | बंगळुरू
लढाऊ विमाननिर्मिती क्षेत्रात शुक्रवारी भारताने मैलाचा ‘तेजस’ दगड गाठला. भारतातच विकसित दोन ‘तेजस’ हलक्या लढाऊ जेट विमानांचा पहिला ताफा भारतीय हवाई दलात सामील करण्यात आला. हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) दोन तेजस विमाने हवाई दलाच्या स्वाधीन केली. कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन माधव रंगचारी यांनी एका तेजस विमानाचे उड्डाण केले.

तेजसचा पहिला ताफा ‘डॅगर्स’ म्हणून ओळखला जाईल. पहिली दोन वर्षे ताफा बंगळुरूमध्ये राहील. नंतर तो तामिळनाडूच्या सुलूर येथे स्थलांतरित होईल. या आर्थिक वर्षात आणि पुढील आर्थिक वर्षात तेजस विमाने सामील करण्याची हवाई दलाची योजना आहे. पुढच्या वर्षी तेजस मोक्याच्या ठिकाणी तैनात करण्यात येईल. हळूहळू तेजस मिग-२१ लढाऊ विमानांची जागा घेईल.
१९७०मध्ये विचार, १९८० मध्ये प्रत्यक्ष कामाला प्रारंभ : स्वदेशीलढाऊ विमानाचा विचार १९७० मध्ये पुढे आला होता. १९८० च्या दशकात त्यावर प्रत्यक्ष काम सुरू झाले. तेजसने जानेवारी २००१ मध्ये पहिली गगनभरारी घेतली होती.
४० विमानांचा ताफा
तेजसच्या सर्व स्क्वॉड्रनमध्ये २० विमाने असतील. प्रारंभिक ऑपरेशन क्लिअरन्सअंतर्गत ही २० विमाने सामील केली जातील. त्यानंतर दृश्य सीमेपलीकडची क्षमता (बियाँड व्हिज्युअल रेंज) असलेली २० विमाने सामील केली जातील. तेजसला अॅक्टिव्ह इलेक्ट्रॉनिक स्कँड अॅरे रडारसारख्या प्रगत प्रणालींसह उन्नत करण्यासाठी २७५ ते ३०० कोटी रुपये लागतील.
32 वर्षांपूर्वी सुरु झाला होता प्रॉजेक्ट
- मेड इन इंडिया फायटर प्लेन निर्माण करण्याची प्रक्रिया 33 वर्षांपूर्वी सुरु झाली होती.
- ऑगस्ट 1983 मध्ये लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्टला (एलसीए) मंजुरी मिळाली होती.
- एलसीए प्रोग्रामसाठी 1984 मध्ये एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी स्थापन करण्यात आली होती.
- स्वदेशात निर्मिततेजस हे लढाऊ विमान हवाई दलात सामील केल्यामुळे आम्हाला अद्वितीय अभिमान, गर्व आणि आनंदाची अनुभूती होत आहे. हे पाऊल भारतीय शास्त्रज्ञांचे कौशल्य आणि क्षमता अधोरेखित करते. -पंतप्रधान नरेंद्र मोदी (ट्विटरवर)
हा राष्ट्रीयगौरवाचा क्षण आहे. देशातच विकसित तेजस लढाऊ जेट हवाई दलात सामील झाले आहे. तेजसमुळे आमची हवाई शक्ती नवी उंची गाठू शकेल. -संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर (ट्विट)
पुढील स्लाइड्सवर पाहा, कसे आहे हे विमान...
बातम्या आणखी आहेत...