आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिझिएत्सूंंना नागालँड मुख्यमंत्रिपदाची शपथ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोहिमा - शुरहोझिली लिझिएत्सू यांचा बुधवारी नागालँडच्या मुख्यमंत्रिपदी शपथविधी झाला. त्यांच्या नेतृत्वाखाली डेमोक्रॅटिक अलायन्स ऑफ नागालँडच्या (डीएएन) १२ सदस्यांच्या मंत्रिमंडळानेही शपथ घेतली.
 
राज्यपाल पी. बी. आचार्य यांनी राजभवनात आयोजित समारंभात लिझिएत्सू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ८१ वर्षीय लिझिएत्सू यांच्यासोबत इतर ११ मंत्र्यांनीही शपथ घेतली. लिझित्सू हे टी. आर. झिलियांग यांची जागा घेत आहेत. लिझिएत्सू नागालँड विधानसभेचे सदस्य नाहीत. 
 
त्यामुळे पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सहा महिन्यांत त्यांना विधानसभेवर निवडून यावे लागेल.ते तब्बल आठ वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. मात्र, त्यांनी २०१३ ची विधानसभा निवडणूक लढवली नव्हती. लिझिएत्सू हे एनपीएफचे तसेच सत्ताधारी डीएएन आघाडीचेही अध्यक्ष आहेत. 
बातम्या आणखी आहेत...