आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

80% गुण मिळूनही प्रवेश नाही, आता शेतीचा निर्धार; शिक्षण प्रणालीवर लिजोने उपस्थित केले प्रश्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिजो जॉयने फेसबुकवर शेअर केलेले हे छायाचित्र. यासोबत लिहिले की, मी याच ठिकाणी राहतो, याची साफसफाई करून शेती करेन. - Divya Marathi
लिजो जॉयने फेसबुकवर शेअर केलेले हे छायाचित्र. यासोबत लिहिले की, मी याच ठिकाणी राहतो, याची साफसफाई करून शेती करेन.
तिरुवनंतपुरम- गुणवत्ता सिद्ध करूनही मनाजोगे कॉलेज न मिळाल्याचे एक उदाहरण समोर आले आहे. लिजो जॉय याने १२ वीची परीक्षा ७९.७ % गुणांसह उत्तीर्ण केली. मनासारख्या महाविद्यालयासाठी तो वणवण फिरला. प्रवेशाची पाचवी कट ऑफ यादी येईपर्यंत त्याने वाट पाहिली, मात्र तरीही त्याचा भ्रमनिरास झाला. दुसरीकडे त्याच्या मित्रांना ५० टक्के मिळूनही आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला. या व्यवस्थेवर निराश होत लिजोने अखेर शेती करण्याचा निर्णय घेतला आहे.  

तिरुवनंतपुरमचा रहिवासी लिजोने ही व्यथा फेसबुकवर शेअर केली. पोस्टसोबत शेतीच्या कामाचे छायाचित्र शेअर केले. सध्याची शैक्षणिक प्रणाली वाईट आहे. शेतकरी असण्याचा अवश्य अभिमान आहे, मात्र याची निवड नाइलाजाने करावी लागली आहे. या प्रणालीमुळेच मी शेतकरी होत आहे. लिजोची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लिजोची संपूर्ण पोस्ट वाचा...  

व्यवस्था चांगली नाही
आपली शिक्षण प्रणाली निष्फळ आहे. माझ्यासोबतच्यांना ५०% मिळूनही हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला. ७९.७% मिळूनही मी प्रवेशाविना आहे. प्रवेश प्रक्रियेदरम्यान मी एक सत्य शिकलो ते म्हणजे, प्रवेशासाठी आरक्षण व राजकीय वशिला हेच निकष आहेत. मी या ठिकाणीच राहतो. ही जमीन साफसूफ करून शेती करेन. शिक्षण घेताना शेतीचा विषय डोक्यात घेतला नव्हता. आमा मात्र करेन. माझे वय काय आहे याला महत्त्व नाही. आता मी मातीचा सुगंध चाखेन.
बातम्या आणखी आहेत...