आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजुरा गावात सिंहांचा धुमाकुळ ; 12 गायींसोबत 15 प्राण्यांची केली शिकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो केवळ सादरीकरणासाठी घेण्यात आला आहे
राजुला (गुजरात) - राजुला तालुक्यातील कातर गावात काल रात्री सिंहाच्या एका कळपाने चांगलाच धुमाकुळ घातला. मध्यरात्री पाच सिंहांनी गावात प्रवेश केला आणि गावातील 12 गाय, 1 डुकरासमेवत इतर 15 प्राण्यांचा बळी घेतला. सिंहाच्या या हिंसक कृत्यामुळे संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण होते. या हल्ल्यात गावातील एका गणेश मंडळही भंग पावले. अमरेली जिल्ह्यातील रेवन्यू भागात सिंहाचे धुमाकूळ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
भुकेल्या सिंहाने शिकार आणि जेवणासाठी गावाचा रस्ता धरला. गावातात पोहोचण्या आधीच दुसर्‍या एका गावात या सिंहानी 12 गायींची शिकार केली होती. राजुला भागात घुसलेल्या सिंहांच्या कळपाची माहिती मिळताच आरएफओ एस.व्ही. राठोड रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी कातर गावाकडे धाव घेतली.

पुढील स्लाईडवर पाहा, घटनास्थळावर सिंहाने शिकार केलेल्या प्राण्यांचे फोटो...
(पुढील सर्व फोटो - दिव्य भास्कर)