जोधपूर - येथील राष्ट्रीय विधी विद्यापीठात (नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी) शनिवारी रात्री ज्यूनियर्सने सिनियर्स विद्यार्थ्यांना फेअरवेल पार्टी दिली. कॅम्पसमध्ये झालेल्या या पार्टीत विद्यार्थी-विद्यार्थींनींनी यथेच्छ दारू ढोसून आणि रविवारी सकाळपर्यंत धिंगाणा सुरु होता. या सर्व प्रकाराबाबत विद्यापीठाने मात्र कानावर हात ठेवले आहेत.
प्राध्यापकांची पाठ फिरताच सुरु झाली पार्टी
- प्रशासनाचे म्हणणे आहे, की फेअरवेल पार्टीमध्ये विद्यार्थी दारू प्यायल्याची आमच्याकडे माहिती नाही.
- या पार्टीत शनिवारी रात्री 12 वाजतापर्यंत विद्यार्थी नाच-गाणे आणि भोजणावर ताव मारत होते.
- त्यानंतर प्राध्यापक पार्टीतून बाहेर पडले आणि विद्यार्थ्यांनी दारुच्या बाटल्या बाहेर काढल्या.
दरवर्षी ज्यूनिअर्स देतात पार्टी
- एनएलयू मध्ये दरवर्षी ज्यूनियर्स पास आऊट झालेल्या सिनियर्सला फेअरवेल पार्टी देतात.
- शनिवारी रात्री झालेल्या पार्टीत विद्यार्थी दारूच्या बाटल्या घेऊन मंचावर नाचत होते.
- एनएलयूचे कुलसचिव सोहनलाल शर्मा यांनी विद्यार्थ्यांनी पार्टीत काय-काय केले याची माहिती नसल्याचे म्हटले आहे.
- पार्टीसाठी असलेल्या कर्मचाऱ्यांकडून माहिती घेण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
- जर पार्टीत मद्यपान झाले असेल तर गैरकृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे, शर्मा म्हणाले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, दारु ढोसून धिंगाणा घालणारे भावी विधिज्ञ