आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Literature News : Amish Tripathi Book Get 6 Crores Rupee Purcharse Rights

साहित्य विश्‍व: अमिश त्रिपाठींच्या पुस्तकाची 6 कोटी रुपयांत हक्क विक्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - प्रसिद्ध लेखक अमिश त्रिपाठी यांच्या इमॉर्टल्स ऑफ मेलुहा या पुस्तकाचे हक्क अमेरिकी निर्मात्याने विक्रमी किंमत देऊन विकत घेतले आहेत. संबंधित निर्मात्याचे नाव गुप्त ठेवण्यात आले असून त्यासाठी पुस्तकाच्या हक्कापोटी तब्बल 10 लाख डॉलर (सुमारे 6 कोटी 15 लाख रुपये) पैसे मोजले आहेत.
बॉलीवूड दिग्दर्शक करण जोहर याने पुस्तकावर आधारित चित्रपटासाठीचे हक्क विकत घेतल्याचे सांगण्यात येते. अमेरिकी निर्मात्यासोबत माझ्या पुस्तकाच्या हक्काबाबतचा करार केला आहे. त्याचे नाव आत्ताच जाहीर करणार नाही, याची घोषणा लवकरच करण्यात येईल, असे अमिश त्रिपाठी यांनी जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलदरम्यान सांगितले. वेस्टलँड प्रकाशकाने त्रिपाठी यांच्या शिवा ट्रायोलॉजीतील द इमॉर्टल्स ऑफ मेलुहा (2010), द सिक्रेट ऑफ नागाज (2011) आणि द ओथ ऑफ वायुपुत्राज (2013) या पुस्तकांसाठी करार केला आहे. बँकिंग क्षेत्रातून लेखनाकडे वळलेले त्रिपाठी दुसरे पुस्तक लिहिण्याच्या तयारीत आहेत. नवे पुस्तक ट्रायोलॉजीवर असणार नाही. मात्र, मला ज्या विषयात जास्त रस आहे त्या धार्मिक, ऐतिहासिक विषयावर ते आधारलेले असेल, असे त्रिपाठी यांनी सांगितले.
देशांतर्गत चित्रपट उद्योग आणि प्रकाशन उद्योग सध्या एकमेकांशी अनुकूल पद्धतीने वाटचाल करत आहेत. 1950 आणि 60 च्या दशकात पुस्तकावर आधारित चित्रपट येण्याचे प्रमाण जास्त होते, कालांतराने हा ट्रेंड मागे पडला. भारतीय चित्रपट उद्योग कात टाकत आहे. कथानकाला जास्त महत्त्व दिले जात आहे. मुख्य भूमिकेत काम करणा-या अभिनेत्यांना सकस कथानक हवे असते. सर्वाधिक खपाच्या पुस्तकातील कथानकावर चित्रपट निर्मिती करण्यास निर्माते उत्सुक असतात, असे मत त्रिपाठी यांनी व्यक्त केले.