आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE Assam Violence: 12 Arrested After Another 9 Bodies Recovered

आसामात 32 अल्पसंख्यांकांची हत्या; सिब्बल-अब्दुल्लांचा मोदींवर हल्ला, भाजपचा पलटवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुवाहाटी - आसाममधील बक्सा जिल्ह्यात शनिवारी आणखी 9 मृतदेह आढळून आले आहेत, त्यासोबतच मृतांची संख्या 32 वर गेली आहे. दोन जिल्ह्यांमध्ये बोडो अतिरेक्यांकडून झालेल्या गोळीबार आणि जाळपोळीच्या घटनांमध्ये आता पर्यंत 32 जणांचा मृत्यू झाला आहे. या हिसांचारात पाच महिला आमि चार बालकांचा समावेश आहे. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी या हिंसाचाराला भाजप आणि नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. जम्मू- काश्मिरचे मुख्यमंत्री उमर अब्दूल्ला यांनी देखील या हिंसाचाराला मोदीच जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

आता राजकीय वार
आसाम हिंसाचाराला काँग्रेसने भाजप आणि नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरले आहे. केंद्रीय कायदे मंत्री कपिल सिब्बल म्हणाले, 'मोदींमुळे देशातील वातावरण बिघडत आहे. त्यामुळेच आसाममध्ये हिंसाचार भडकला आहे. सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर इतरही अनेक आरोप केले आहेत. सिब्बल म्हणाले, भाजप समर्थक ट्विटर आणि इतर सोशल साइट्सवर पाकिस्तान आणि बांगलादेशची छायाचित्रे अपलोड करुन त्याला भारताचा भाग दाखवून सर्वसामान्यांना गोंधळात टाकत आहेत.'

काँग्रेसकडून भाजप आणि मोदींवर हल्ला झाल्यानंतर भाजपकडून पलटवार करण्यात आला आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार आहे, त्यामुळे या घटनेला काँग्रेस सरकारच जबाबादार असल्याचा ठपका भाजपने ठेवला आहे.
शुक्रवारी अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार करून घरांना आग लावली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच प्रशासनाने लष्कराला पाचारण केले.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मृतांबद्दल सदभवाना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, 'आमचा पक्ष आणि संपूर्ण देश मृतांच्या नातेवाईकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.' दहशतवादी कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग देखील दोन जिल्ह्यांमध्ये झालेल्या या हिंसाचारावर बारकाईने लक्ष्य ठेवून आहेत. पंतप्रधान डॉ. सिंग यांनी मुख्यमंत्री तरुण गोगई यांच्याशी शनिवारी फोनवरुन चर्चा केली आणि परिस्थितीची माहिती घेतली.
का झाला हिंसाचार
अशी माहिती आहे, की आपल्या उमेदवाराला मते न दिल्यामुळे नाराज बोडो अतिरेक्यांनी हत्यासत्र घडवून आणले.
घटनेबद्दल पोलिस महानिरीक्षक एल.आर. बिश्नोई यांनी सांगितले, की ‘एनडीएफबीएस’ या अतिरेकी संघटनेच्या सुमारे 40 सशस्त्र लोकांनी शुक्रवारी पहाटे कोक्राझार जिल्ह्यातील बालापार गावात अल्पसंख्याकांच्या काही घरांवर हल्ला केला. गुरुवारी रात्री उशिरा अतिरेक्यांनी बक्सामध्ये असाच हल्ला केला होता. मृतांमध्ये तीन मुले व चार महिलांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर लोकांनी दोन्ही गावे सोडून धुबरी येथे आश्रय घेतला. बोडोलँड नेत्या प्रमिला ब्रम्हे यांच्या वक्तव्यामुळेच हिंसाचार भडकल्याचा दावा अल्पसंख्याकांनी केला.

पोलिस महानिरिक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) एस.एन.सिंह यांनी सांगितले, की बक्सा जिल्ह्यातील सलबरी, मुशलपूर, तामुलपूर येथे सायंकाळी सहा ते सकाळी चार वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहिल. ज्यामुळे आणखी हिंसाचाराच्या घटना घडणार नाही.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, हल्ल्यानंतरची भयावहता..