आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील निवडणुकीचे Live Feed, पारदर्शक मतदान प्रक्रियेसाठी आयोगाचा पुढाकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इलेक्शन डेस्क - राज्यातील मदतानाची आकडेवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. त्याचप्रमाणे निवडणूक प्रक्रियेदरम्यान पारदर्शकता राहावी आणि मतदारांना विश्वास निर्माण व्हावा यासाठी निवडणूक आयोगातर्फे यावर्षी राज्यातील अनेक भागांतील मतदान केंद्रावरील LIVE दृश्ये दाखवण्याची सोय केली आहे. मतदान आयोगाच्या संकेतस्थळावर एका खास प्रणालीच्या मदतीने ही दृश्ये राज्यातील नागरिकांना पाहता येणार आहेत. काही ठरावीक जिल्ह्यांतील मोजक्या मतदान केंद्रांवरील मतदानप्रक्रियेचे थेट प्रक्षेपण या माध्यमातून लोकांना पाहायला मिळणार आहे. यामध्ये नांदेड, गडचिरोली, हिंगोली, सातारा, सोलापूर, परभणी, औरंगाबाद, गोंदिया, पालघर येथील दृश्ये सध्या या माध्यमातून पाहायला मिळत आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा राज्यातील विविध जिल्ह्यांचे LIVE FEED...