आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE VIDEO: आत्महत्‍येसाठी युवतीची \'शोलेस्‍टाईल\', वीरु ऐवजी \'बसंती\' चढली पुलावर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - शहरामध्‍ये गुरूवारी एक युवतीने फिल्‍मी स्‍टाईल आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केला. उड्डाणपुलावर जाऊन मुलगी 'मी आत्‍महत्‍या करत आहे, कुणी मला वाचवू नका, असे जोरजोरात ओरडत होती. ओरडत असताना दोन-तीन वेळा तिचा तोल गेला होता. आत्‍महत्‍या करत असल्‍याचे तिने पोलिसांनाही कळविले होते. तिने उडी मारल्‍यानंतर घटनास्‍थळी जमलेल्‍या नागरिकांनी तिला वाचवण्‍याचा प्रयत्‍न केला. तिच्‍या पायाला थोडा मार लागला. उपचारासाठी तिला महात्‍मा गांधी रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. सुत्रांनूसार असे कळले, की मुलगी कुटुंबियांवर नाराज होती. त्‍याचबरोबर तिचे प्रेमसंबध असल्‍याचेही स्‍पष्‍ट झाले आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

पुढील स्‍लाइडवर पाहा, मुलीचा उड्डाणपुलावरुन उडी घेतानाचा व्हिडिओ...