आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षभर राहिले लिव्ह-इनमध्ये, मुलाचा गळफास तर मुलीचा मृतदेह शेतात सापडला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर (छत्तीसगड)- भिलाई येथील कपलचे मृतदेह विचित्र अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुलाचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तर मुलीचा मृतदेह जवळच असलेल्या एका शेतात सापडला. मुलीच्या मृतदेहाजवळ दुचाकीही पडलेल्या अवस्थेत आढळून आली. दोघांनी आत्महत्या केली असावी असे सांगितले जात आहे. दरम्यान, पोलिस ऑनल किलिंगच्या शक्यताही तपासून बघत आहे.
पोलिसांनी सांगितले की
- मुलाचे नाव मिथिलेश सावर्णि तर मुलीचे नाव अनामिका शर्मा आहे. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते.
- दोघांच्या प्रेमप्रकरणाला कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे त्यांनी घरातून जाण्याचा निर्णय घेतला.
- वर्षभरापासून दोघे लिव्ह-इनमध्ये राहत होते. मुलीने कोचिंग क्लासही सुरु केले होते. मुलगाही एका कंपनीत कामाला होता.
- त्यानंतर दोघांनी आर्य समाज मंदिरात लग्नही केले. तेव्हापासून दोघे सोबत राहत होते.
- काही महिन्यांपूर्वी दोघांमध्ये भांडणे सुरु झाली. त्यामुळे मुलगी मावशीकडे राहायला गेली होती. मिथिलेश एकटाच राहायचा.
तिसऱ्या व्यक्तीचा शोध
- मिथिलेश, अनामिका आणि एक तिसरा तरुण असे तिघे येथील एका पेट्रोल पंपावर आले होते.
- पेट्र्रोल भरल्यानंतर तिघे निघून गेले. काही दूर अंतरावरही काही लोकांनी या तिघांना सोबत बघितले होते.
- आता दोघांचे मृतदेह सापडल्याने पोलिस या तिसऱ्या तरुणाचा शोध घेत आहेत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा घटनास्थळाचे आणखी फोटो.....
बातम्या आणखी आहेत...